भगवा अन बाण बघून कामाला लागायचं; एकजूट हीच आपली ताकद - खा. खैरे


शिवसेनेसाठी तळमळीने काम करा; दोन्ही जिल्हाप्रमुखांचे काम चांगले - संपर्कप्रमुख जाधव

बीड  ( प्रतिनिधी )
शिवसेना नेते, मराठवाडा संपर्कप्रमुख, खा चंद्रकांत खैरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना नवनियुक्त बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव साहेब यांच्या नेतृत्वात बीड येथे जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांना अभिप्रेत असणारा पक्ष आपल्याला उभा करायचा आहे . त्यासाठी पदाधिकाऱ्यांचे काम प्रामाणिक असले पाहिजे. निवडणुका समोर आहेत. पक्षासाठी काम करा. एकमेकांच्या तक्रारी नको. कामचुकारपणा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात बीडचे संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी पदाधिकाऱ्यांच्या बजावले. त्यांची नियुक्ती झाल्यानंतर बीडमध्ये काल ते पहिल्यांदाच आले होते. मराठवाडा संपर्कप्रमुख तथा शिवसेना नेते खा चंद्रकांत खैरे यांनी यावेळी भगवा अन बाण बघून कामाला लागायचं,  एकजूट हीच आपली ताकद आहे असे सांगत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
     आजी - माजी पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी झाली. यावेळी मराठवाडा संपर्कप्रमुख तथा शिवसेना नेते खा चंद्रकांत खैरे यांनी 'आगामी निवडणुकात शिवसेनेला मैदान जिंकायचे आहे. समोर कोणी ही असो एकजूट आपली ताकद आहे. समोर भगवा ध्वज आणि धनुष्यबाण बघून कामाला लागायचं आहे. आता कामाला लागा आणि आपले कर्तृत्व सिद्ध करा, असे आवाहन केले. 'दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या कामांचा आढावा घेऊन समाधान व्यक्त करत आनंद जाधव पुढे म्हणाले, आपण बीड जिल्ह्यात शिवसैनिकांची नव्याने मोट बांधणार आहोत. आठ दिवसाचा जिल्हा दौरा करणार आहोत. गावागावात जाऊन स्थापन केलेल्या शाखा आपण तपासणार आहोत. कामचुकारपणा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना भविष्यात पदावर राहण्याचा अधिकार नसणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर आहेत. बीड मतदार संघावर आपण विशेष लक्ष देणार आहोत. शिवसेनेचा भगवा फडकावयाचा आहे. शिवसैनिकांनी कामाला लागावे. यश खेचून आणायचे आहे. जनतेच्या सुख दुःखात सहभागी व्हा. दुष्काळात सर्वसामन्यांना आधार द्या. कोणी अन्याय करत असेल तर अन्यायाच्या विरोधात पेटून उठा', असेही आनंद जाधव यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक यांनी यावेळी मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे, सहसंपर्कप्रमुख प्रा. सुनील धांडे, चंद्रकांत नवले, माजी मंत्री बदामराव पंडित, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, अनिल विचारे, सुनील विचारे, जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे, संजय महाद्वार, जिल्हा सचिव जयसिंग चुंगडे, जिल्हा संघटक गोरख सिंघण, भरत जाधव, योगेश नवले, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब अंबुरे, बंडू पिंगळे, हनुमान जगताप, भारत जगताप, आशिष मस्के, सुशील पिंगळे, शेख एजाज, बबलू खराडे, पप्पू ठक्कर,  किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, युवासेना जिल्हाप्रमुख सागर बहिर, जिल्हा सहसचिव मशरू पठाण, तालुकाप्रमुख गणेश वरेकर, कालिदास नवले, किरण चव्हाण, कुमार शेळके, राहुल चौरे, अप्पासाहेब जाधव, व्यंकटेश शिंदे, अर्जुन वाघमारे, रत्नाकर शिंदे, संदीप माने, युवासेना सहसचिव विपुल पिंगळे, युवासेना राज्य विस्तारक शिवराज बांगर,  महिला आघाडी जिल्हा संघटक संगीता चव्हाण, चंद्रकलाताई बांगर, जिल्हा सहसंघटक रतन गुजर, पंचायत समिती सभापती अभिजित पंडित, माजी तालुकाप्रमुख विनायक मुळे, माजी जिप सदस्य पंढरीनाथ लगड, रोहित पंडित, माजी पंसस दीपक काळे, विधानसभा प्रमुख नितीन धांडे, उपतालुकाप्रमुख दिनकर शिंदे,  अरुण भोसले, शहरप्रमुख सुनील सुरवसे, परमेश्वर बेदरे, पंस सदस्य गुंडिबा नवले, नगरसेवक लक्ष्मण विटकर, संजय उडाण, युवा नेते यशराज घोडके, विधानसभा संघटक रणजित आखाडे, अजय दाभाडे, तालुका समन्वयक अर्जुन नलावडे, रमेश तांबारे, जालिंदर वांढरे, युवासेना कक्षप्रमुख शेखर शिंदे, युवासेनेचे राहुल साळुंके, राहुल फरताळे, सुरज चुंगडे, महिला आघाडीच्या शेख फरजाणा, उज्वला भोपळे, उपशहरप्रमुख कल्याण कवचट, हनुमान पांडे, जितेश शिंदे, जब्बार शेख, उपतालुकाप्रमुख सखाराम देवकर, संदीप सोनवणे, आबा आगलावे, विभागप्रमुख आदिनाथ भांडवले, काकासाहेब जाधव, बाळू मोरे आदींसह आजमाजी पदाधिकारी या जिल्हा आढावा बैठकीस उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....