हभप दत्ता महाराज गिरी यांचे कीर्तन आणि बदामराव पंडित यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान येथे सप्ताहाची उत्साहात सांगता

साधु संतांच्या कृपेने मनुष्य जिवन सार्थकी लागते - ह.भ.प.दत्ता महाराज गिरी
 ----------------------
श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान येथे हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता;हाजारो भाविकांची मांदियाळी
 ----------------------
गेवराई: ( प्रतिनिधी )
     भगवान श्रीकृष्णाच्या गुणाने काला संपन्न होतो.साधु- संत आणि भगवान श्रीकृष्णाचे चरित्र प्रत्येकाने आचरणात आणले पाहिजे.काल्याचा आनंद तुम्हाला इतरत्र कुठेही मिळणार नाही.म्हणुन ज्ञानयज्ञ मंडपात येवून भगवंताचे सदैव नामस्मरण केले पाहिजे.तसेच जिवनात साधुसंतांची कृपा झाली तर जिवनात कोणत्याही गोष्टीची उणीव भासत नाही.आणि खऱ्या अर्थाने मनुष्य जीवन सार्थकी लागते.म्हणुन प्रत्येकाने साधु संतांच्या सानिध्यात राहून त्यांचे आशिर्वाद प्राप्त करुन घ्यावेत असे प्रतिपादन महंत दत्ता महाराज गिरी यांनी श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहात काल्याच्या किर्तन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
    श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगाव(ता.गेवराई) येथे वै.ब्रम्हनिष्ठ गुरूवर्य महंत ह.भ.प.वामन महाराज गिरी यांच्या ४७ व्या पुण्यतिथी सोहळ्या निमीत्त गोरक्षनाथ महाराज व नगदनारायण महाराज यांच्या कृपाशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहास दि.६ फेब्रुवारी रोजी प्रारंभ झाला होता. गेल्या सात दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकारांची सेवा झाली.तर या सप्ताहाची दि.१३ फेब्रुवारी बुधवार रोजी गडाचे महंत ह.भ.प दत्ता महाराज गिरी यांच्या अमृततुल्य काल्याच्या किर्तनाने सांगता झाली.यावेळी गंगाधर महाराज,माजीमंत्री बदामराव पंडित,रासप जिल्हाध्यक्ष परमेश्वर महाराज वाघमोडे,हनुमान महाराज गिरी, सुरेश महाराज कोळेकर,दामोधर भोसले,गरुड महाराज,पं.स.सदस्य परमेश्वर खरात,भाऊसाहेब माखले,आण्णासाहेब राठोड,पत्रकार विनोद पौळ, विनायक उबाळे,संताराम जोगदंड,रामबप्पा लेंडगुळे,बंडु बावचकर,उध्दव पौळ,श्रीधर पौळ,पिकाजी राठोड,नंदकुमार पौळ,सतिष करपे यांच्या सह हाजारो भाविकांची मांदियाळी होती.
       यावेळी पुढे बोलताना महंत दत्ता महाराज गिरी म्हणाले सांधु-संतांच्या आर्शिवादाने आणि आपल्या परिश्रमाने अशक्य गोष्टी शक्य होतात.गोरक्षनाथ संस्थान कुंभेजळगाव या ठिकाणी पहीले दंडक आरण्य होते.भगवान गोरक्षनाथांच्या पदस्पर्शाने ही भुमी पावन झालेली आहे. तर वै.वामन महाराज गिरी यांनी या दंडक आरण्या मध्ये वास्तव्य केलेले आहे.वै.वामन महाराज हे महान तपस्वी होते त्यांनी समाजात जनजागृती चे महान असे कार्य केलेले आहे.तर आज या ठिकाणी त्यांच्या आर्शिवादाने एका रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालेले आपणास पहावयास मिळते आहे.तसेच सध्या भिषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पक्षु,पक्ष्यांना चारा, पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.गाईला चारा द्या.अन्नदान हे सर्वात मोठे दान आहे म्हणुन भुकेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी द्या.यामुळे जिवनात तुम्हाला सुख,समाधान आणि शांती मिळेल.तसेच प्रत्येक मुलानी आपल्या आई-वडीलांची सेवा केली पाहिजे.आणि आई-वडिलांनी देखील मुलांसाठी बंगले व इस्टेट कमविण्यापेक्षा त्यांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजेत.असा मौलिक सल्ला ही महंत दत्ता महाराज गिरी यांनी किर्तन प्रंसगी बोलताना दिला. किर्तनानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यावेळी पंचक्रोशीतील हाजारो भाविकांची मांदियाळी होती.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....