शिवसेना किसान आणि जवानांच्या पाठीशी -- बदामराव पंडित

शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून
अर्धमसल्याच्या असंख्य पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
====================
शिवसेना किसान आणि जवानांच्या पाठीशी -- बदामराव पंडित



=================
गेवराई ( प्रतिनिधी ) जम्मू कश्मीर मधील पुलवामा येथे पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अर्धमसला येथील असंख्य युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित यांनी जवान आणि किसान यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभा असल्याचे प्रतिपादन केले आहे.
                गढी जिल्हा परिषद सर्कल मधील अर्धमसला येथील सरपंच राधाबाई विठ्ठल भालशंकर, ऍड सिंधुताई संजयकुमार चौधरी, विक्रम राऊत, अंगद राऊत, उद्धव पोवळे, अशोक धापसे, उद्धव धापसे, संदीप माटे, अभिमन्यू काळे, राम कादे, प्रल्हाद राऊत, अशोक राऊत, गोरख काळे, अनिल काळे, रमेश उघडे, अंगद मैंद, एकनाथ धापसे, रावसाहेब धापसे, राजाभाऊ पिंपळे, किरण काळे, आश्रुबा भालशंकर आदींसह असंख्य भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. सर्वांचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, युवानेते रोहित पंडित, ऍड सौ उज्वलाताई भोपळे यांनी गळ्यात भगवे रुमाल घालून स्वागत केले. कार्यक्रमास माजी सभापती पंढरीनाथ लगड, शिवसेना तालुकाप्रमुख कालिदास नवले, चर्मकार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र बोराडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे, उपतालुकाप्रमुख दिनकर शिंदे, शहर प्रमुख सोनुभाऊ बेदरे, युवासेना तालुका अधिकारी साहिल देशमुख, सरपंच मुकुंद बाबर, सरपंच ऍड योगेश गव्हाणे, मरीबा हिवाळे, गणेश लाड, राम चव्हाण, विश्वनाथराव बोडखे, शेख नूरभाई, रामेश्वर घल्लाळ, शेख सादेक, त्रिंबक थोपटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. काशर्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर शिंदे यांनी केले. प्रस्ताविकपर भाषणात शेख नूरभाई म्हणाले की, आज आपल्या भारतीय सैन्यावर पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. यात आपले शूर जवान शहीद झाले आहेत. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे केंद्र सरकारने केवळ निषेध करू नये तर थेट पाकिस्तानवर हल्ला करून शहीद जवानांचा बदला घ्यावा. आज देशातील नागरिकांना सुरक्षिततेची गरज आहे आणि ती फक्त शिवसेनाच देऊ शकते असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी बोलताना बदामराव पंडित म्हणाले की, देश आज आतंकवादी हल्ला आणि दुष्काळाच्या संकटातून जात आहे. अशा स्थितीत शेतकरी आणि जवानांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभा आहे. भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देश एकवटला असून सरकारकडून बदल्याची अपेक्षा करत आहे. मोदी सरकारला याबाबत ठोस कारवाई करावीच लागेल, असे सांगून गेवराई मतदारसंघातही सामान्य माणूस, बेरोजगार, शेतकरी यांच्या पाठीशीही शिवसेना खंबीरपणे उभा आहे. प्रत्येकाच्या अडीअडचणीच्या वेळी आम्ही अर्ध्या रात्री धावून येतो आणि यापुढेही येणार असा विश्वास देऊन, शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला कोणतीही अडचण येऊ देणार नाही असे ठामपणे सांगितले. याप्रसंगी पंढरीनाथ लगड, रोहित पंडित, कालिदास नवले,सौ उज्वलाताई भोपळे, साहिल देशमुख यांचीही समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमास बंडू पटाईत, सतिश नरवडे, अशोक मुटके, रमेश राऊत, राजाभाऊ सुर्वे, बबन पिंपळे, सिद्धेश्वर पिंपळे, बंडू नांद्रे, बळीराम पिंपळे, संतोष नरवडे, प्रसाद नांद्रे, भास्कर उघडे, अशोक राऊत, राम पिंपळे, गंगाधर काकडे, माऊली धुमाळ, संजय काकडे, गणेश काकडे आदींसह ग्रामस्थ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वनाथ बोडखे यांनी सर्वांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....