संतोष भाले यांना म फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर



 गेवराई दि १८ ( दिनकर शिंदे ) तालुक्यातील राजपिंपरी येथील जि प प्राथमिक शाळेतील शिक्षक  संतोष सिताराम भाले यांना यंदाचा इब्टा संघटनेचा महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे .
      इंडियन बहुजन टीचर असो. ( इब्टा ) या शिक्षक संघटनेच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केल्या बद्दल भाले संतोष यांना म फुले आदर्श शिक्षक पुरस्कार शनिवार दि २३ फेब्रु २०१९ रोजी दु २ वा आ जयदत्त क्षीरसागर यांचा हस्ते व माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड येथील सामाजिक न्याय भवन येथे दिला जाणार आहे. गेली २५ वर्षे भाले यांनी रुई रांजणी, भाटआंतरवाली, राजपिंप्री येथे शिक्षक म्हणून सेवा करीत अनेक उपक्रम राबविले आहेत.
समाज सहभागातून निधी उपलब्ध करून शाळा डिजिटल करणे, ऊसतोड शिबिर सुरु न करता 65 विद्यार्थी पालकांसोबत जाण्यापासून रोखले, शाळा सिध्दी मध्ये A ग्रेड मध्ये शाळा आणण्यासाठी प्रयत्न, स्वतःच्या मुलीचा वाढदिवस घरी न करता, तो साजरा करताना शाळेतील सर्व 250 विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले, शाळेतील विद्यार्थ्यांना अवांतर वाचन गोडी वाढविण्यासाठी स्वखर्चाने 100 पुस्तके विकत घेऊन नियमित सराव, लोकसहभागातून शाळा समृद्ध केली, जिज्ञासा कसोटी प्रश्न निर्मिती संचात सहभाग, स्वच्छ ग्राम अभियानात सहभाग,
बीड आकाशवाणी वर शाळेतील मुलांचा सहभाग यासाठी प्रयत्न,
 निवडणूक कार्यात मास्टर ट्रेनर म्हणून मागील 15 वर्षांपासून सहभाग आदी सामाजिक , राष्ट्रीय, शैक्षणिक कार्य केलेली आहेत. आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गटशिक्षण अधिकारी आनंद मसरे, शाळेचे मुख्याध्यापक विशाल कुलकर्णी, शालेय समितीचे अध्यक्ष पानखडे , सरपंच दिलीप मोरे, प्रा. राजेंद्र बरकसे, माजी नगरसेवक गोरखनाथ शिंदे, प्रल्हाद शिंदे, मंगेश कुलकर्णी . कालिदास देशमाने, प्रदिप सराफ, शाळेचे कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....