मराठा सेवा संघाचे समाजभूषण पुरस्कार जाहीर


    बीड ( प्रतिनिधी )  बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी मराठा सेवा संघाच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
       यावर्षी देखील अनेक मान्यवर व्यक्तीना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.प्रशासकीय क्षेत्रातील मराठा समाजभूषण पुरस्कार यावर्षी पाटोदा तहसीलचे नायब तहसिलदार मा.गणेशजी जाधव  यांना तर,सामाजिक क्षेत्रातील मराठा समाजभूषण पुरस्कार मराठा क्रांती मोर्च्याचे लढवय्ये शिलेदार  अशोकभाऊ हिंगे यांना व उद्योग क्षेत्रातील आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणारे राजकमल कन्ट्रक्शन चे संस्थापक राजेंद्रजी आप्पा लाटे यांना तर साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल जिजाउरत्न पुरस्कार बीडच्या आद्य मराठी स्त्री गझलकारा प्रा.सौ.सुहासिनी विवेकरंजन देशमुख यांना जाहीर करण्यात आले आहेत.
     हे सर्व पुरस्कार 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मानव्यरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
        या कार्यक्रमात जेष्ठ विचारवंत प्रा.गंगाधर बनबरें यांचे व्याख्यान होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायणगड संस्थानचे मठाधिपती आदरणीय ह.भ.प.शिवाजी महाराज उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मा.बाळकृष्ण हनपुडे पाटील डी. वाय. एस. पी.अँटी करप्शन बीड,डॉ अशोक थोरात साहेब जिल्हा शल्य चिकित्सक बीड,मा.अविनाशजी शिंगटे, तहसीलदार बीड हे उपस्थित राहणार आहेत.
       पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
        या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाअध्यक्ष अशोक ठाकरे,जिल्हाकार्याध्यक्ष शिवश्री ज.रा.शिंदे आप्पा,प्रकाश लेणेकरजिल्हा सचिव धनंजय शेंडगे,जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री शिवाजी शिंदे,बाबासाहेब मुटकुळे, इंजि संजय देशमुख जिल्हा प्रवक्ता बापूसाहेब शिंदे,जिल्हा संघटक प्रा.पंजाबराव येडे,बबन तांबे,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष मोहिनीताई डांबे, कार्याध्यक्षा आनिताताई भोसले ,गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष डोंगरे,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाअध्यक्ष राहुल वायकर,जिल्हाउद्योग कक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम गवते,समन्वय कक्षाचे जिल्हाध्यक्ष बी.बी.जाधव साहेब,महात्मा फुले इतिहास परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.बाळासाहेब पिंगळे, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष आनंद पिंगळे, जिल्हासचिव सुरेश ढास,मराठा सेवा संघ तालुका बीडचे विलास शिंदे,संतोष माने,शिवाजी शिंदे,श्रीमंत सातपुते, युवराज घोडके आदिंनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....