महापुरुषांना जाती धर्माच्या बंधनात बांधु नका -- गणेश सावंत


गेवराई [ दिनकर शिंदे ] ------- जातेगावात शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी
===============================
तरुणांनी समाजहिताच्या कार्यात गटतट विसरुन एकञ यावे. राजकारणापेक्षा समाजकारणात तरुणांनी झोकुन देऊन कार्य करत राहील्यास, गावाच्या विकासाला चालना मिऴेल. शिवजयंती निमीत्त व्याख्यान व समाजहिताचे उपक्रम ठेवल्याने उद्याच्या पिढीला चांगले संस्कार लागतील असे प्रतिपादन शिवव्याख्याते गणेश सावंत यांनी जातेगाव येथे आयोजित शिवजयंती उत्सव प्रसंगी केले आहे.
         गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमीत्त दि 18  रोजी नृत्य स्पर्धा तसेच, दि 19 रोजी शिवप्रतीमा पुजन व गावातुन बालशिवाजी महाराजांची घोड्यावर टाऴमृदंगाच्या व ढोलताशाच्या गजरात मिरवनुक काढण्यात आली.  दुपारी यमाई मंदीरात बालकिर्तनकार सोनाली सागडे हिचे शिवकिर्तन संपन्न झाले.  शिवजयंती अध्यक्ष गोपाल  चव्हाण, उपाध्यक्ष बाऴासाहेब चव्हाण, सचिव कालीदास काकडे,  रामेश्वर चव्हाण, भरत दादा चव्हाण, सुनिल मिसाऴ, करण यमगर, अण्णा चव्हाण, आशिष कुलकर्णी, यांनी डि जे व वर्गणी मुक्त आदर्श जयंती साजरी करण्याचा संकल्प करत सामाजिक सांस्क्रतीक कार्यक्रम आयोजित केले होते. यावेऴी बोलतांना शिवव्याख्याते  गणेश सावंत म्हणाले की,  तरुनांनी शिवजयंती साजरी करतांना व्यसनमुक्त राहून, सर्व जाती धर्माला एकञ करुन जयंती साजरी करावी. समाजाची आजची दशा व दिशा यावर बोलतांना गणेश सावंत म्हणाले की, आजच्या पिढीला सोशल मिडीयाने घेरले आहे. त्यामुऴे संस्कारहिन पिढी जन्माला येत आहे. भवीष्य उज्वल करायचे आसेल तर, महापुरुषांचे विचार आजच्या पिढीच्या डोक्यात जाणे गरजेचे आहे.  यावेळी प्रमुख पाहुने म्हनुन  जि प प्र सदस्य पांडुरंग थडके, रासपाचे अध्यक्ष  परमेश्वर वाघमोडे , प स सदस्य सिध्दार्थ नरवडे , महेश मोटे सरपंच ढिगांबर खरात, शरद कबले, वसंत सुसकर, नाना पवार पञकार भागवत जाधव, सचिन लव्हाऴे, काकासाहेब पवार, चेअरमन अनिल पवार, अण्णासाहेब मस्के, संजय उनवने उपस्थित होते. कार्यक्रमाचे  सुञसंचालन व अभार प्रदर्शन  आशिष कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी प्रतिक्षा कबले,पल्लवी चव्हाण ,प्रगती चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले   राजाभाऊ यमगर बाबुराव चव्हाण,भास्कराव चव्हाण , गोरख चव्हाण, रामेश्वर पवार, गणेश पवार, धुरवडे अण्णा, शिवाजीराव चव्हाण, सोनवने सर, देवीदास चव्हाण, आच्युत आर्दड, अनंत धोंडरे , राधेशाम धोंडरे, दत्ता वाघमारे, राधेशाम लेंडाऴ, अमोल धोंडरे, कल्याण वाघमारे, विशाल पांढरे, सिध्दार्थ माटे, अजिम शेख, अण्णा चव्हाण, अकाश चव्हाण, युवराज चव्हाण, गोविंद चव्हाण, भागवत ढोरमारे, कृष्णा गवते, कृष्णा चव्हाण, अशोक चव्हाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कश्मिरमध्ये शहीद झालेल्या  जवानांना यावेळी आदरांजली व मानवंदना देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....