25 फब्रुवारीला इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा राज्यव्यापी बंद

 गेवराई ( दिनकर शिंदे ) ------  इन्डिपेन्डट इंग्लिश स्कुल्स असोसिएशन ( IESA ) संघटना गेल्या सहा वर्षापासून इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे विविध प्रश्न सोडवून घेण्यासाठी काम करीत आहे. याच मगण्यांसाठी दि 25 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱयांनी दिली आहे.
         इंग्रजी शाळांच्या समस्यांबद्दल अनेक वेळा शासन दरबारी वेगवेगळ्या माध्यमांतून निवेदने यापूर्वी देण्यात आली असतांना देखील, शासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही.  त्यामुळे  ईसा संघटना इंग्रजी शाळांचा राज्यव्यापी एक दिवशीय शाळाबंद आंदोलन करणार आहे. दि .२५ फेब्रुवारी वार सोमवार रोजी ईसा संघटनेच्या सभासद असलेल्या राज्यातील ५ हजार शाळा या आंदोलनात सहभागी होणार आहेत . राज्याप्रमाणे आपल्या बीड जिल्हयातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा या दिवशी बंद ठेवून आपला सहभाग नोंदविणार आहेत . जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईसा संघटनेच्या राज्यव्यापी शाळा बंदची आपण दखल घेऊन संघटनेच्या खालील मागण्या शासनदरबारी मांडून तात्काळ कार्यवाही होण्यासाठी मदत करावी .प्रमुख मागण्या 1 नोव्हेंबर 2018 चा शासन निर्णय तात्काळ मागे घ्यावा व वर्ष 2012  ते 2019 पर्यंत RTE 25 % प्रवेशाचा थकित फि परतावा तातडीने अदा करावा. राज्यातील सर्व शाळांसाठी शाळा सुरक्षा कायदा करण्यात यावा . 18 नोव्हेंबर 2013 च्या शासन आदेशामध्ये दुरुस्ती करण्यात यावी. शालेय विद्यार्थी वाहतुक संदर्भामध्ये मुख्याध्यापका ऐवजी शाळेने नियुक्त केलेल्या वाहतुक व्यवस्थापकावर सदर जबाबदारी सोपविण्यात यावी. स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर दर्जावाढ प्रस्तावासाठी ऑनलाईन प्रक्रिया तातडीने सुरु करावी असे म्हटले आहे. निवेदन देताना निखिल सर, (ईसा सहसचिव), सानप श्रीमंत (ईसा जिल्हा सचिव), दिलीप पारेकप (जिल्हा अध्यक्षा), पटाईत सर (सागर इंग्लिश स्कुल सिरसदेवी) आदींसह संघटनेच्या सदस्य यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....