गेवराईत 45 लाखांचा गुटखा पकडला ; ट्रक घेतली पोलिसांनी ताब्यात


गेवराई ( दिनकर शिंदे  ) गेवराई -गढी दरम्यान पोलिसांच्या विशेष पथकाने एका ट्रकमध्ये 45 लाखांचा गुटखा पकडला आहे. हा ट्रक धाराशीवहून जालन्याकडे जात होता. वाटेत एका हॉटेलजवळ तो उभा असताना पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.
 शुक्रवारी रात्री अडीच वाजता गेवराई गढी रोड वरील ट्रक क्रमांक एम.एच 18 एए 6845 हा गढी जवळील राजस्थानी हॉटेल समोर थाबंल्याची माहिती पोलीस अधिक्षक बीड यांच्या पथकाला मिळाली. त्या माहितीवरून लगेचच या पथकाने पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांच्या नेतृत्वाखाली गेवराईच्या दिशेने धाव घेतली आणि ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून एकनाथ दत्तु परदेशी (संजयनगर ता. श्रीरामपुर जि, नगर) आणि शेख जब्बार शेख (मुसा रा, लोहगाव पुणे) अशी त्यांची नावे आहेत.

Comments

Popular posts from this blog

शरद पवारांकडून धक्कातंत्र ; बीडसाठी राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडितच ?

वाढत्या गर्भाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर विद्या पवार यांनी दिला हा सल्ला