जिजाऊ ब्रीगेडच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी सौ.अनिता नितीन भोसले

जिजाऊ ब्रीगेडच्या बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी
सौ.अनिता नितीन भोसले यांची बिनविरोध निवड

====================
बीड ( प्रतिनिधी )
     मराठा सेवा संघ व इतर 33 कक्षाच्या बैठकीचे आयोजन प्रजासत्ताक दिनी शासकीय विश्रामगृह बीड येथे मराठा सेवा संघाचे जिल्हाअध्यक्ष अशोकजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याच बैठकीत मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रीगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या,क्रांती मोर्च्यात धडाडीने काम करणाऱ्या सौ.अनिता भोसले यांच्या कार्याची दखल घेऊन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकजी ठाकरे साहेब व जिजाऊ ब्रीगेडच्या जिल्हाध्यक्ष सौ.मोहिनीताई डांबे यांनी त्यांची जिजाऊ ब्रीगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड केली आहे.
      या बैठकीला मराठा सेवा संघाचे जिल्हाकार्याध्यक्ष शिवश्री ज.रा.शिंदे,जिल्हा सचिव धनंजय शेंडगे,जिल्हा प्रवक्ता बापूसाहेब शिंदे,जिल्हा संघटक प्रा.पंजाबराव येडे,गाडगेबाबा समाजप्रबोधन कक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष डोंगरे,शिंदे,विलास शिंदे नवनाथ वाघ योगेश ठोसर,यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
    सर्वांनी सौ.अनिता भोसले यांना निवडीबद्दल अभिनंदन करून कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....