आतेरेकी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ गेवराई कडकडीत बंद


गेवराई ( प्रतिनिधी ) जम्मू काश्मीर मधील पुलवाम येथे भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात शोककळा पसरली असून, या हल्ल्याच्या निषेधार्थ गेवराई शहर स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
        जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी  रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. या दुर्घटनेच्या निषेधार्थ गेवराई शहरातील व्यापारी, सर्वपक्षीय संघटना व नागरीकांनी निषेध रँली काढुन शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करणयात आली. दि 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, शास्त्री चौक, मेन रोड मार्ग निषेध रँली काढण्यात आली. मोंढा नाका, संतोष नगर येथे पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद घोषणा देत पाकच्या पंतप्रधानाच्या  पुतळ्यावर चपलाचा हार घालुन पुतळा दहन करण्यात आला. यावेळी गेवराई शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या दुकान कडकडीत बंद ठेवत शहिद जवानांना श्रद्धांंजली अर्पण केली. यावेळी शहरातील सर्व समाजबांधवांसह व्यापारी, डॉक्टर, वकील, पत्रकार, युवक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....