शिवसेना महिला आघाडीची शाखा स्थापन करून रणरागिणींनी रणशिंग फुंकले ..

शिवसेना महिला आघाडीची शाखा स्थापन करून
टाकरवणच्या रणरागिणींनी रणशिंग फुंकले

====================
आनंदराव जाधव व बदामराव पंडित यांची उपस्थिती
====================
गेवराई ( प्रतिनिधी )  सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जो धावून येईल आणि सुख, दुःख वाटून घेईल त्याच्याच पाठीशी मतदारसंघातील जनता उभा राहील, असा दृढ विश्वास व्यक्त करत शिवसेना महिला आघाडीची शाखा स्थापन करून टाकरवणच्या रणरागिणींनी जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या उपस्थितीत माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या विजयासाठी रणशिंग फुंकले आहे.
          गेवराई विधानसभा मतदारसंघातील टाकरवण येथे  असंख्य महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शिवसेना महिला आघाडीच्या शाखेचा दि 25 फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव व माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सौ गिरीका भाभी पंडित, जि प सभापती युधाजित पंडित,  माजी सभापती पंढरीनाथ लगड,  युवानेते रोहित पंडित, भास्करराव कचरे, गेवराई तालुकाप्रमुख कालिदास नवले, सौ उज्वलाताई भोपळे, सौ नंदाताई तौर, सौ सुनीताताई भुंबे, वसीमभाई पटेल, पप्पू लाखोटीय आदींची प्रमुख उपस्थिती होती. शाखाप्रमुख अर्चना ताई पवार उपप्रमुख निलावती ताई सगळे सचिव अनिताताई मस्के सदस्य सुनिता ताई गायकवाड कांचन ताई गायकवाड सुशीला ताई आहिरे नंदाताई पदाधिकाऱ्यांचा गळ्यात घालून यावेळी सत्कार करण्यात आला तर अंगदराव तौर,  डॉ अंगद गायकवाड,  सोनू पठाण, पंढरीनाथ सगळे, रावसाहेब गायकवाड, अनिल गायकवाड, दगडू भुंबे, रमेश पटेकर, शेख अफरोज, बालासाहेब सुरवसे, रमेश राठोड नर्सिंग तौर यांनी उपस्थितांचे स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अंगद गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन तालुका उपप्रमुख दिनकर शिंदे यांनी केले यावेळी नंदाताई तौर आणि सुनीताताई भुंबे यांनी आक्रमक भाषण करून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते थापाडे असून केवळ बदामराव पंडित हेच गोरगरीबांची काळजी घेणारे लोकनेते आहेत असे सांगून, सौ गिरीकाभाभी पंडित यांनी आमचे प्रश्न सोडवून आम्हाला मोठे बळ दिले आहे. त्यामुळेच महिला संघटित झाल्या आहेत. आता ही ताकद येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बदामराव पंडित यांच्या पाठीशी उभा करून त्यांना विधानसभेत पाठविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करणार असल्याचा दृढनिश्चय त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव म्हणाले की, शिवसेनेला बदामराव पंडित यांच्या रूपाने, समाजामध्ये मिसळून, प्रत्येकाचे प्रामाणिक काम करणारा, मनमिळावू लोकनेता मिळाला आहे. राज्यात शिवसेना-भाजप युती झाली असून गेवराई व बीड हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेसाठी फिक्स असल्याने येणाऱ्या विधानसभेत बदामराव पंडित हे युतीचे आमदार म्हणून प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. लोकसभेला आम्ही भाजप उमेदवाराच्या विजयासाठी  प्रामाणिकपणे काम करणार आहोतच पण, आता भाजपा पदाधिकाऱ्यांनी सुद्धा एकदिलाने कामाला लागून बदामराव पंडित यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावे असे आव्हान करून, गोरगरिबांच्या सेवेसाठी बदामराव पंडित, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ गिरीकाभाभी पंडित व त्यांचे संपूर्ण कुटुंब रात्रंदिवस झटत आहे. याचे फळ त्यांना निश्चित मिळेल असेही जाधव म्हणाले. जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी, बदामराव पंडित यांच्यामुळे  जिल्ह्यातील शिवसेनेला मोठे बळ मिळाल्याचे सांगून, बीड तालुक्यातून विधानसभेला त्यांना 15 हजारापेक्षाही अधिक मताधिक्य आम्ही मिळवून देणार असल्याचे ते म्हणाले. तर बदामराव पंडित यांनी महिला आघाडीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून, कोणत्याही  कार्यकर्त्याला किंवा ग्रामस्थांना  कोणतीही अडचण आल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. निश्चितपणे त्याचे काम केले जाईल अशी ग्वाही उपस्थितांना दिली. यावेळी वसीम पटेल, पंढरीनाथ लगड, कालिदास नवले, सौ उज्वलाताई भोपळे, किरण आहेर यांचीही समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे, महादेव औटी संभाजीराव थोरात, प्रकाश आळणे, श्रीराम रिंगणे, सुदाम पवार, शहबाज खान, प्रतापसिंह पाटील, निलेश मुळे, महादेव सुरवसे, अशोक नाईकनवरे, अभिमान रिंगणे, सुनील रिंगणे, सुहास आगे, अंकुश गरड, मनोज गाडे, प्रकाश पाटेकर, शिवाजी जगताप, मच्छिंद्र धायजे, लहू यादव, दादासाहेब कचरे, गणेश गिरी, विठ्ठल तौर, संचालक गायकवाड, मोइज इनामदार आदींसह ग्रामस्थ व महिला शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....