चांगले कार्य केल्याशिवाय , चांगला माणूस ही पदवी मिळत नाही -- संतोष गर्जे

गेवराई [ दिनकर शिंदे ] -------
श्री संत भगवानबाबा विद्यालयात
दहावीतील विद्यार्थ्यांना निरोप

------------------------
आयुष्यात शिक्षण घेऊन अनेक पदवी मिळवता येतील परंतु चांगला माणूस म्हणून पदवी मिळवायची असेल तर त्यासाठी निश्चितपणे चांगले कार्य करावे लागते. कमी गुण मिळाले म्हणून खचून न जाता आयुष्याच्या परीक्षेत गुणात्मक जीवन जगू या उद्देशाने काम करा, असा मौलिक सल्ला सहारा अनाथालयचे संचालक संतोष गर्जे यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव या शाळेत दि.१८ रोजी दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला, त्याप्रसंगी गर्जे बोलत होते.
      या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पूजन करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहारा अनाथालय गेवराईचे संस्थापक अध्यक्ष संतोष गर्जे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच तात्याराम सुळ, माजी सरपंच जनार्दन चितळकर, सखाराम मुगुटराव, मधुकर मुगुटराव, जि.प.के प्रा. शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक बापुराव घुले, बडे दादा, हैसाबाई कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.  प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बापुराव घुले यांनी केले. यावेळी दहावी वर्गातील विदयार्थ्यींनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला. तर काही विद्यार्थींना शाळेला निरोप देताना अश्रु अनावर झाले. यावेळी बोलताना सहारा अनाथलयाचे संस्थापक अध्यक्ष संतोष गर्जे म्हणाले की, येथील विद्यार्थ्यानी शिक्षकाकडुन जे ज्ञान आत्मसात केले आहे, ते आपल्या भावी जिवनात नक्कीच उपयोगी ठरणारे आहे. कारण दहावी नंतरचे जिवन हे व्यवहारी जिवन आहे. आपण शिक्षणातुन विविध प्रकारच्या पदव्या घेता येतात, पण चांगला माणुस ही पदवी घेण्यासाठी आपल्या हातुन चांगले कार्य घडावे लागते. आयुष्यात काही करावयाचे असेल तर मला नौकरी मिळाली नाही, म्हणुन नाराज न होता कोणताही उद्योग व्यवसाय करा.  व्यसना पासुन आलिप्त राहा. येणाऱ्या परिक्षेत मार्क अपेक्षा पेक्षा कमी पडले म्हणुन नाराज न होता. भविष्यात येणाऱ्या विविध परिक्षेत आपण नक्कीच यश प्राप्त करू असे मनात ठाम निच्छय करा असे ते म्हणाले. यावेळी तात्याराम सुळ, जनार्धन चितळकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर येवलेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भागवत सोळुंके, अंजली माने, मुक्ता मोटे, नवनाथ घुगे, भागवत सिरसट, हरिभाऊ आघाव, वर्षा कांडेकर, प्रसाद कुलकर्णी, शिवजी पवार, गोरख साकळे, बाबासाहेब कांबळे, ज्ञानेश्वर बास्टे आदीसह नववी वर्गातील विद्यार्थ्यानी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....