भारतिय जवानांनी हवाई हल्ला करत पाक अतिरेक्यांचा दहशतवादी तळ केला उद्‌ध्वस्त


====================
दिल्ली ( प्रतिनिधी ) जम्‍मू- काश्मीरमधील पुलवामामध्ये भारतीय जवानांवर झालेल्‍या दहशतवादी भ्याड हल्‍ल्‍यामुळे 48  जवान शहीद झाले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या भारतीयांनी अतिरेक्यांवर मोठी कारवाई करण्याबाबत केंद्र सरकारवर मोठा दबाव आणला आहे. तसेच या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्‍तानमधील संबंध खूपच ताणले गेले आहेत. दोन्ही देशांच्या सीमेवरील हालचालींमध्येही वाढ झाल्‍याने युध्दसदृष्‍य परिस्‍थिती बनली आहे. सतत पाकिस्‍तानकडून शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन करण्यात येत आहे. भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे देशांमध्ये पाकिस्तान विरोधात संतप्त भावना व्यक्त होत आहेत. आता भारतानेही याचा बदला घ्यावा, यासाठी सरकारवर दररोज मोठ्या प्रमाणात दबाव वाढत असल्याने, अखेर भारतीय सैन्याने दि 26 फेब्रुवारी रोजी पहाटे मोठी कारवाई केली असून एलओसी ओलांडून हल्ला करत पाकच्या अतिरेक्यांचे दहशतवादी तळ उध्वस्त केले आहेत. याबाबत भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केल्याचा पाकच्या पत्रकाराचा व्हिडिओ पाकमधूनच सर्वत्र व्हायरल झाला आहे.
       भारतीय हवाईदलाच्या विमानाने आंतरराष्‍ट्रीय सीमेचे उल्‍लंघन केल्‍याचा आरोप पाकिस्‍ताननेही केला आहे. पाकने म्‍हटले आहे की,आम्‍ही कारवाई केल्‍यानंतर हे भारतीय विमान पुन्हा भारतीय हद्‍दीत निघून गेले. पाकिस्‍तान सेनेचे प्रवक्‍ते जनरल आसिफ गफूर यांनी भारतावर हा आरोप केला आहे. गफूर म्हणाले की, भारतीय हवाई दलाच्या विमानाने मुजफ्‍फराबाद सेक्‍टरमध्ये घुसण्याचा प्रयत्‍न केला. यावेळी पाकिस्तानने विरोध केल्‍यानंतर हे विमान पुन्हा भारतीय हद्‍दीत निघून गेले. यावेळी कोणतेही नुकसान झाले नसल्‍याचे त्यांनी म्‍हटले आहे. भारतीय हवाई दलाकडून मात्र अद्याप या घटनेबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
   पाकिस्‍तानचे विदेश मंत्री कुरेशी यांनी संयुक्‍त राष्‍ट्राकडे यापूर्वीच तक्रार केली होती, ज्‍यामध्ये भारत आपल्‍यावर युध्द लादण्याचा प्रयत्‍न करत आहे. मात्र आपल्‍याला शांती पाहिजे असे म्‍हटले होते.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....