3 हजाराची लाच स्विकारताना गेवराई पं.स.मधील विस्ताराधिकारी पकडला

3 हजाराची लाच स्विकारताना गेवराई पं.स.मधील विस्तार अधिकारी येळंबकर लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला
-------------------------------------
गेवराई ( दिनकर शिंदे  )
  शेतातील बांधबंदिस्तच्या कामावरील फाईलवर टिप्पणी टाकुन देण्यासाठी गेवराई येथील पंचायत समिती मधील विस्तार अधिकाऱ्यानी 4 हजाराची लाच मागितली होती. दरम्यान यामधील 3 हजाराची लाच स्विकारताना त्यास रंगेहाथ पकडले. हि कारवाई लाचलुचपत विभागाने येथील पंचायत समितीमध्ये बुधवारी 1 वाजण्याच्या सुमारास केली. या कारवाईमुळे पंचायत समितीमध्ये मोठी खळबळ उडाली होती.  विनायक भास्करराव येळंबकर असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे.
              लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील एका तक्रारदाराने शेतातील बांधबंदिस्त कामावरील फाईलवर टिप्पणी टाकण्यासाठी येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विनायक येळंबकर हे 4 हजाराची लाच मागत असल्याची तक्रार करण्यात आली होती. यानंतर या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता येळंबकर लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बुधवार दि.27 फ्रेब्रुवारी रोजी येथील पंचायत समिती कार्यालयात सापळा रचण्यात आला. दरम्यान दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तक्रारदार याच्याकडून विस्तार अधिकारी विनायक येळंबकर यांनी ठरलेल्या रक्कमेतील 3 हजार स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यानंतर येळंबकर यांना अटक करून येथील पोलिस ठाण्यात नेण्यात आले. ही कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक हनपुडे पाटील, पोलिस निरीक्षक गजानन वाघ, पोलिस शिपाई, कल्याण राठोड, भरत गारदे, मनोज गदळे, चालक पोना गणेश मेहेत्रे आदींनी केली. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....