संतप्त भारतीयांचे रक्त खवळले ... जम्मू- काश्मीर मध्ये झालेल्या भ्याड हल्यात 42 भारतीय जवान शहीद


जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर दशहतवाद्यांकडून आयईडी हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये 42 जवान शहीद झाल्याची माहिती आहे. तर 45 पेक्षा जास्त जवान जखमी असल्याची प्राथमिक माहित देण्यात येत आहे. भयानक स्फोटानंतर सैन्यावर अतिरेक्यांनी गोळीबारही केला. जैश ए मोहम्मदने या हल्लाची जबाबदारी स्वीकारली आहे. गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील गोरिपोरा येथे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला टार्गेट केले. लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी मार्गावर स्फोट घडवला. यानंतर दहशतवाद्यांनी ताफ्यावर अंदाधूंद गोळीबार केला.  आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवला. आदिल अहमद हा 2016 नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला, अशी माहिती आहे. गुरुवारी पुलवामा येथील महामार्गावरुन सीआरपीएफचा ताफा जात होता. या ताफ्यात जवळपास २५ बस होत्या. एकूण अडीच हजार जवानांचा हा ताफा होता, असे स्थानिक वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. जम्मूवरुन श्रीनगरला हा ताफा जात होता.
 घटनास्थळी वरिष्ठ पोलीस दाखल झाले असून, या हल्ल्याचा तपास सुरू आहे. हल्ला झाला त्यावेळी 2500 जवानांचा ताफा तिकडून जात होता. जखमींना उपचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, या दहशतवादी हल्ल्याच्या सर्व शक्यता आम्ही पडताळून पाहत आहोत असे सीआरपीएफचे डीजी आर. आर भाटनगर यांच्या यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे मात्र संपूर्ण भारतीय हळहळले असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
● शाहिद झालेल्या जवानामध्ये...
1. जयमाल सिंह- 76 बटालियन
2. नसीर अहमद- 76 बटालियन
3. सुखविंदर सिंह- 76 बटालियन
4. रोहिताश लांबा- 76 बटालियन
5. तिकल राज- 76 बटालियन
6. भागीरथ सिंह- 45 बटालियन
7. बीरेंद्र सिंह- 45 बटालियन
8. अवधेष कुमार यादव- 45 बटालियन
9. नितिन सिंह राठौर- 3 बटालियन
10. रतन कुमार ठाकुर- 45 बटालियन
11. सुरेंद्र यादव- 45 बटालियन
12. संजय कुमार सिंह- 176 बटालियन
13. रामवकील- 176 बटालियन
14. धरमचंद्रा- 176 बटालियन
15. बेलकर ठाका- 176 बटालियन
16. श्याम बाबू- 115 बटालियन
17. अजीत कुमार आजाद- 115 बटालियन
18. प्रदीप सिंह- 115 बटालियन
19. संजय राजपूत- 115 बटालियन
20. कौशल कुमार रावत- 115 बटालियन
21. जीत राम- 92 बटालियन
22. अमित कुमार- 92 बटालियन
23. विजय कुमार मौर्य- 92 बटालियन
24. कुलविंदर सिंह- 92 बटालियन
25. विजय सोरंग- 82 बटालियन
26. वसंत कुमार वीवी- 82 बटालियन
27. गुरु एच- 82 बटालियन
28. सुभम अनिरंग जी- 82 बटालियन
29. अमर कुमार- 75 बटालियन
30. अजय कुमार- 75 बटालियन
31. मनिंदर सिंह- 75 बटालियन
32. रमेश यादव- 61 बटालियन
33. परशाना कुमार साहू- 61 बटालियन
34. हेम राज मीना- 61 बटालियन
35. बबला शंत्रा- 35 बटालियन
36. अश्वनी कुमार कोची- 35 बटालियन
37. प्रदीप कुमार- 21 बटालियन
38. सुधीर कुमार बंशल- 21 बटालियन
39. रविंदर सिंह- 98 बटालियन
40. एम बाशुमातारे- 98 बटालियन
41. महेश कुमार- 118 बटालियन
42. एलएल गुलजार- 118 बटालियन
यांचा समावेश असल्याचे समजते.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....