बीड हा बाळासाहेब ठाकरे यांच्या सच्चा सैनिकांचा जिल्हा -- संपर्कप्रमुख आनंदराव जाधव

जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी
झंझावती दौरा करून बीड तालुक्याचा घेतला आढावा

===================
● कुंडलिक खांडे "दबंग" जिल्हाप्रमुख -- आनंद जाधव
----------------------------
चारा छावणीलाही भेट ; शेतकऱ्यांशी साधला संवाद
====================
बीड  ( प्रतिनिधी ) शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या असलेल्या बीड विधानसभा मतदारसंघात जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सर्कल निहाय शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन झंझावती दौरा केला जनावरांच्या चारा छावणीला भेट देऊन आनंद जाधव यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.
          लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात झालेल्या शिवसेना-भाजप युतीच्या घोषणे नंतर बीड जिल्ह्यात आलेल्या जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी गेवराई तालुक्यानंतर नंतर बीड विधानसभा मतदारसंघात झंजावती दौरा केला. बीड शहरातील  पदाधिकारी व शिवसैनिकांशी शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयात  चर्चा केल्यानंतर संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी मौजे घाटसाळवी येथे शिवसेनेच्या शाखेचा शुभारंभ केला. नाळवंडी सर्कल मधील शिवसैनिकांचीही बैठक घेऊन पक्षसंघटन मजबूतीचा आढावा घेतला. यावेळी महिला संपर्कप्रमुख संपदाताई गडकरी, जिल्हाप्रमुख  कुंडलिक खांडे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुनील धांडे, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, जिल्हासमन्वयक बाप्पासाहेब घुगे, महिला जिल्हासंघटक संगीता चव्हाण, हनुमान जगताप, आशिष मस्के, बाळासाहेब अंबुरे, जयसिंग चुगडे, तालुकाप्रमुख गणेश वरेकर, गोरख सिंगण, नितीन धांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ठिकठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी कुंडलिक खांडे यांचा दबंग जिल्हाप्रमुख म्हणून उल्लेख करून म्हणाले की, बीड जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि आजही आहे. प्रत्येक तालुक्यात शिवसैनिक त्याच उमेदीने काम करत आहे. बीड मतदारसंघ तर खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या सच्चा शिवसैनिकांचा आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्याने शिवसेनेचाच उमेदवार विजय झाला पाहिजे,  यासाठी गट-तट आणि मतभेद विसरून प्रत्येक शिवसैनिकाने भगवा हाती घेऊन मतदाराच्या घराघरापर्यंत पोहचावे. बीड व गेवराई मतदार संघ शिवसेनेलाच राहणार असून, आणखी एक मतदारसंघ सोडून घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. बीड मतदारसंघातील नागरिकांनी आज पर्यंत शिवसेनेला भरभरून प्रेम दिले आहे. यापुढेही त्यांचे प्रेम आणखी वाढविण्यासाठी, प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सामान्य माणसाच्या संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी सोडवाव्यात आणि संघटन मजबूत करावे अशा सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.  साक्षाळ‌पिंप्री येथे शिवसेना तालुका समन्वयक अर्जुन नलावडे यांनी सुरु केलेल्या जनावरांच्या चारा छावणीला भेट देऊन संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. शेतकऱयांनीही मोकळ्या मनाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
बीड, नाळवंडी सर्कल  घाटसावळी सर्कल मध्ये झालेल्या बैठकांना सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, शाखेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....