रामपुरीच्या अमरसिंह मस्के यांची घोडी सर्वात खुबसूरत ; 21 हजाराचे प्रथम पारितोषिक

रामपुरीच्या अमरसिंह मस्के यांची घोडी सर्वात खुबसूरत
अश्वस्पर्धेत 21 हजाराचे प्रथम पारितोषिक पटकावले

====================
गेवराई ( दिनकर शिंदे )  शिवजयंती निमीत्त दि 19 रोजी तीर्थपुरी येथे अश्वस्पर्धा घेण्यात आल्या. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत गेवराई तालुक्यातील रामपूर येथील अमरसिंह अंकुशराव मस्के यांची घोडी सर्वात खूबसूरत ठरली असून या अश्वाने खूबसुरती मध्ये 21 हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
        शिवजयंतीनिमित्त तीर्थपुरी येते आयोजित  या अश्व स्पर्धेत आपल्या अश्वांसह अश्वधारकांनी मोठा सहभाग नोंदवला. आ. राजेश टोपे यांच्या हस्ते  शिवप्रतिमेचे पुजन करुन या स्पर्धाना सुरुवात झाली. यावेळी सागरचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, सरपंच शैलेंद्र पवार, संयोजक चंद्रकांत पवार व सुदाम मापारे तसेच मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या यातील खूबसूरती या गटातील प्रथम क्रमांकाचे 21 हजाराचे बक्षीस गेवराई तालुक्यातील रामपूरी येथील अमरसिंह अंकुशराव म्हस्के यांच्या अश्वाला देण्यात आले. दितीय बक्षीस 11 हजार रुपये गोविंद फनसे यांच्या अश्वाला तर तृतीय बक्षीस साहेबराव चव्हाण यांच्या अश्वाला पाच हजार रुपये देण्यात आले . चाल व रेस या गटात प्रथम व द्वितीय क्रमाकांचे बक्षिस वसीम अन्सारी ( परभणी ) व साहेबराव चव्हाण यांच्या अश्वांना रुपये 35 हजार विभागुन देण्यात आले . तृतीय बक्षीस रु . 5555 धुन कठाळु काजी यांच्या अश्वाला देण्यात आले . नाचकाम या गटात प्रथम क्रमांक सुरज निपारे ( बीड ) यांच्या अश्वाला मिळाला द्वितीय क्रमांक अशोक जगताप ( अंबड ) व तृतीय क्रमांक चंद्रकांत पवार यांच्या अश्वाने पटकावला . या स्पर्धेत पंचाचे काम पुनम बामणे , शास्त्री , नरेश मुंडे , डॉक्टर चिंचोलकर , डॉक्टर जनक वाडे , आय ए शेख यांनी केले. यावेळी परिसरातील अश्वप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....