पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत जमियत उलेमा , मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध


बीड दि.18 [ दिनकर शिंदे ]  ----- शहीद जवानांना आदरांजली अर्पण
=============================
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या  जवानांना जमियत उलेमा ए हिंद बीडच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. सोमवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून रॅली काढून पाकिस्तान मुर्दाबाद,  हिंदुस्थान जिंदाबाद , वीर जवान अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. या रॅलीमध्ये मुफ्ती,  मौलाना यांच्यासह राजकीय पदाधिकारी , कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बीड येथील जमियत उलेमा ए हिंद शाखेच्या वतीने सोमवारी मल्टीपर्पज  मैदान येथून  निषेध रॅली काढण्यात आली. पुलवामा येथील दहशतवादी  हल्ल्याचा  तीव्र शब्दात  निषेध नोंदवण्यात आला.  हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन  रस्त्यावर उतरलेल्या जमियत उलेमा हिंदच्या पदाधिकाऱ्यांसह मुस्लिम युवक आणि नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबाद , हिंदुस्तान जिंदाबाद , वीर जवान अमर रहे अशा घोषणा दिल्या. त्यानंतर उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन बाळगून भारतीय जवानांना आदरांजली अर्पण केली. यावेळी मुफ्ती अतिकुर रहेमान सहाब, मौलाना जाकेर सिद्दीकी सहाब , मौलाना अब्दुल बाकी सहाब, मौलाना अब्दुल हादी सहाब , हाजी जुनेद सहाब , हाजी जमील सहाब, हाजी जावेद सहाब, मौलाना सलीम अशरफी , मुफ्ती मोहियोद्दीन सहाब, मौलाना मुख्तार सहाब, मौलाना सलमान कासमी, हाजी मोहसीन सहाब, हाजी फसीयोद्दीन सहाब, हाजी मोईन सहाब, हाजी अब्दुल अजीज सहाब, हाजी फैजान सहाब, हाजी अकरम सहाब, हाजी इमरान सहाब यांच्यासह माजी आ. सय्यद सलीम , मोईन मास्टर , सलीम जहाँगिर , फारूक पटेल, हेमंत क्षीरसागर, अशोक हिंगे, खदीरभाई जवारीवाले, खुर्शीद आलम , मुसा खान , इरफान बागवान , डॉ. इद्रिस हाश्मी , हरिसन फ्रान्सिस रेड्डी  आदींची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....