शिवभक्तांनो घरावर भगवा झेंडा लावून प्रत्येकात शिवविचार रुजवा -- बदामराव पंडित


====================
शिवजयंती निमित्त बंगल्यावर फडकवला भगवा झेंडा
====================
गेवराई ( प्रतिनिधी ) स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. सरदारांना शेतकऱ्यांच्या गवताच्या पात्याला धक्का न लागू देण्याचे आदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपल्या घरावर भगवे ध्वज उभारून साजरी करा आणि प्रत्येकाच्या मनात शिवविचार रुजवा असे आवाहन माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी शिवभक्तांना केले आहे.
              छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवजयंती पूर्वदिनी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी आपल्या बंगल्यावर भगवा ध्वज उभारून शिव प्रतिमेस अभिवादन केले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अमोल करंडे, जेष्टनेते गहिनीनाथ ढाकणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे, उपजिल्हाप्रमुख शेख एजाज, तालुका उपप्रमुख दिनकर शिंदे, शाहिन पठाण, सुलेमान पठाण, आबा उबाळे, सरपंच सुरेश नागरे, जालिंदर कामटे, सुनील म्हेत्रे, शेख सादेक, राऊत, नावडे, पापा चव्हाण, गंगाधर गोरडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना बदामराव पंडित म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जाती- धर्मातील सर्व जाती, पोटजातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले. गोरगरिबांवर अन्याय करणाऱ्या  स्वकीयांना सुद्धा छत्रपती शिवरायांनी माफी न देता, त्यांना कठोर शिक्षा देऊन कायद्याचे राज्य उभा केली होते. दाही दिशांनी वेगवेगळ्या शत्रूंनी स्वराज्याला घेरले असतानाही केवळ जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक शत्रूचे हल्ले परतवून लावले. मावळ्यांच्या एकजुटीमुळेच आलेल्या प्रत्येक शत्रूला चारीमुंड्या चीत करण्याचे काम शिवरायांनी केले. सर्व समाजातील व धर्मातील गोरगरीब आणि स्त्रियांना सन्मानाने वागणूक देण्याची शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येक माणसात रुजविण्याचे काम शिवभक्तांनी करावे, असे आवाहनही माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केले. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी "छत्रपती शिवाजी महाराज की जय", " जय भवानी जय शिवराय" अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपतालुकाप्रमुख दिनकर शिंदे यांनी तर आभारप्रदर्शन उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे यांनी केले. यावेळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....