बीड लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवणार - ऍड गणेश कोल्हे

गेवराई [ दिनकर शिंदे ] ------ बीड लोकसभा मतदारसंघासाठी
ऍड गणेश कोल्हे हे
महाराष्ट्र विकास आघाडी कडून उमेदवार राहणार ?

====================
गेवराई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र विकास आघाडी राज्यामध्ये लोकसभेची निवडणुकीसाठी उमेदवार देणार असून बीड लोकसभा मतदार संघासाठी गेवराई येथील एडवोकेट गणेश कोल्हे हे उमेदवार असण्याची शक्यता पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली आहे.
           महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने झालेल्या पत्रकार परिषदेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष - बसंवतअप्पा उबाळे , पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस - डॉ . सुभाष माने , पक्षाचे राष्ट्रीय वक्ते - डॉ . सुरेश वाघमारे , पक्षाचे - राज्याचे सरचिटणीस अॅड . अनिरुध्द येचाळे , युवा महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रांत अध्यक्ष - संतोष कोल्हे , ऍड गणेश कोल्हे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपाध्यक्ष बसवंतप्पा उबाळे म्हणाले की राज्यामध्ये ठराविक घरांमध्येच एकमेकांशी नातेगोत्याचे संबंध असून सत्ताही त्यांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे सामान्य माणसावर अन्याय होतो. चांगली काम करणारी माणसे राजकारणातून बाहेर जात आहेत. भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. विशेषता धनगर समाजाच्या आमदार-खासदार यांनीही याबाबत सरकारला कधीही जाब विचारला नाही. त्यामुळे समाजाला न्याय देण्यासाठी आणि इतर सर्व समाजाला सोबत घेऊन राजकारणाची नवी दिशा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी लोकसभेच्या निवडणुका लढवणार आहे. यासाठी बीड लोकसभा मतदार संघासाठी देवळा येथील ऍड गणेश कोल्हे हे उमेदवार राहतील, असे सांगून वंचित विकास आघाडीच्या घटक म्हणून महाराष्ट्र विकास आघाडी राज्यामध्ये काम करत आहे. लवकरच मुंबईत आघाडीची सर्वसमावेशक बैठक होऊन त्यात उमेदवारी जाहीर होतील असे सांगून ते म्हणाले की, राज्यात 80 टक्के बहुजन समाज असतानाही तीन टक्के लोक असलेले लोक राज्यात सत्ता भोगत आहेत. राज्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न त्यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकरी आणि जनावरांच्या चारा - पाण्याचा गंभीर प्रश्‍न बनला असताना भाजप सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे. याप्रसंगी बोलताना एडवोकेट गणेश कोल्हे म्हणाले की, आपण बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास सज्ज असून पक्षाकडून उमेदवारी मिळो अथवा न मिळो आपण निवडणूक लढणारच असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर युवा महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष कोल्हे म्हणाले की, गेवराई तालुक्यात बीड जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-शिवसेना युती हे केवळ सत्तेसाठी राजकारण करतात मात्र सत्तेत आल्यावर सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....