जातेगावात येथे गणेश सावंत यांचे व्याखान तर सोनाली सागडेच्या शिवकिर्तनाचे आयोजन


====================
डिजे व वर्गणी मुक्त शिवजयंती   होणार साजरी
====================
गेवराई  ( प्रतिनीधी )
    गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. या वर्षी दुष्काऴाचे भान ठेऊन आदर्श राजा शिवछञपती महोत्सव साजरा करण्यात येत आसुन न्रत्य, स्पर्धा, शोभायाञा आणी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून डिजे व वर्गणी मुक्त शिवजयंती साजरी होणार आहे.
      तालुक्यातील जातेगाव येथे सार्वजनिक शिवजयंतीनिमीत्त संयोजन समितीच्या वतीने दि 18  फेब्रुवारी रोजी सांस्क्रतीक कार्यक्रम दि 19 रोजी सकाऴी 10 वा शिवप्रतिमा पुजन व भव्य शोभा याञा मिरवनुक काढण्यात येणार आहे. दुपारी 1 वा यमाई मंदीर येथे ह. भ. प. कु.सोनाली सागडे या सात वर्षीय बाल किर्तनकाराचे शिवकिर्तन व तदनंतर उपस्थितांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. राञी 8 वाजटा बाजारस्थऴ येथे प्रख्यात शिवव्याख्याते गणेश सावंत यांचे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.  डिजे व वर्गणी मुक्त शिवजयंती साजरी करण्यात येत असुन जयंतीतुन गोरगरीबांना धान्य संकलन  उपक्रम, महापुरुष ग्रंथालय प्रतिमा व वृक्ष भेट देण्यात येणार आहे. या  कार्यक्रमात नागरीकानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष गोपाल चव्हाण, उपाध्यक्ष बाऴासाहेब चव्हाण, सचिव कालीदास काकडे, संघटक आशिष कुलकर्णी, कार्यध्यक्ष सुनिल मिसाळ, सहकार्यध्यक्ष करण यमगर, मार्गदर्शक रामेश्वर जिजा चव्हाण,  सदस्य नामदेव चव्हाण, सोहेल शेख, शिवाजी मिसाऴ, युवराज चव्हाण, अण्णा चव्हाण आदींनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....