गेवराईतील वाळू माफियांना प्रशासनाचे अभय आहे का? -- राहुल चाळक

गेवराई, दि. १५  __ अवैद्य वाळू उपसा प्रकरणी सध्या गेवराई मध्ये मनाई आदेश असताना देखील सर्रासपणे गंगावाडी आणि राजापूर या गावातून अवैध वाळू वाहतूक होत आहे. वाळू माफियांना प्रशासनाचे अभय आहे का असा प्रश्न आता गावकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. 

      गेवराई तालुक्यातील मौजे राजापूर व गंगावाडी या गावातील नागरिकांनी छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी यांच्याकडे मदतीची हाक दिली होती. गावातील व्यक्तींनी अनेक वेळा गेवराई येथील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, गेवराई व तलवाडा पोलीस स्टेशन यांकडे वाळू माफियांची सतत तक्रार करूनही प्रशासन यांची पाठराखण करत आहे. वाळू माफिया हे टिप्परने बीड आणि औरंगाबाद या ठिकाणी विक्री करत आहेत. हीच गोष्ट लक्षात घेता आज छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेवराईचे तहसिलदार जोशी यांना निवेदन दिले आहे. निवेदनावर छावा शे.आ.जिल्हाध्यक्ष राहुल चाळक, तालुकाध्यक्ष दिलीप मोटे, शे.आ. तालुकाध्यक्ष मुक्ताराम मोटे, जय राम काळे, बापूसाहेब मुळे, वामन मुळे, उद्धव मुळे आदींच्या सह्या आहेत. लवकरात लवकर राजापूर गंगावाडी या भागातील वाळू माफियांवर आळा घालण्यात यावा अन्यथा छावा क्रांतिवीर सेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असा इशारा देखील देण्यात आला आहे. 
     राजापूर आणि गंगावाडी या भागात वाळू माफिया हे राजरोजपणे वाळू उपसा करत आहेत. प्रशासन मात्र डोळेझाक करून यांची पाठराखण करत आहे. अवैद्य वाळू उपसा प्रकरणी सध्या गेवराई मध्ये मनाई आदेश असताना देखील सर्रासपणे गंगावाडी आणि राजापूर या गावातून अवैध वाळू वाहतूक होते. या मनाई आदेशाचा देखील उल्लंघन वाळू माफिया करत आहेत. पोलीस स्टेशनही या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे. सर्वसामान्य माणसाने आवाज केला असता वाळू माफिया त्यांना जिवे मारण्याची धमकी देत आहेत. वाळू माफियांना प्रशासनाचे अभय आहे का असा प्रश्न आता गावकऱ्यांकडून होत असल्याचे म्हणटले आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....