गेवराई व बीड मतदारसंघ शिवसेनेसाठी फिक्स ; बदामराव पंडित हेच होणार युतीचे आमदार -- संपर्कप्रमुख आनंदराव जाधव


====================
गेवराई ( प्रतिनिधी ) शिवसेनेने लावून धरलेल्या मागण्या मान्य झाल्याने भाजपा सोबत सत्तेत समान वाटा राहील अशीच युती  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई आणि बीड हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेसाठी फिक्स असून इतर आणखी एक मतदारसंघही सोडून घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. गेवराईतून शिवसेनेचे बदामराव पंडित हेच युतीचे आमदार होतील असा ठाम विश्वास देऊन, बीड जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी घराघरात जाऊन पक्ष संघटन मजबूत करण्याच्या सूचना शिवसैनिकांना दिल्या आहेत.
             येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना आणि भाजप यांची युती झाल्यानंतर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून नवनियुक्त शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव हे गेवराई विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी दि 25 फेब्रुवारी रोजी तालुक्यात आले आहेत. माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी झालेल्या शहरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते याप्रसंगी माजीमंत्री बदामराव पंडित, महिला जिल्हा संपर्कप्रमुख संपदाताई गडकरी, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, ऍड एम एस इंदानी, सौ गिरीकाभाभी पंडित, जि प सभापती युधाजित पंडित, पं स सभापती अभयसिंह पंडित, युवानेते रोहित पंडित, महिला आघाडी जिल्हा संघटक ऍड संगीताताई चव्हाण, चंद्रकलाताई बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव म्हणाले की, आगोदर कार्यकर्त्यांच्या पोटाचे पाहणाऱ्या  बदामराव पंडित यांच्यासारखा बीड जिल्ह्यात दुसरा लोकनेता नाही. त्यामुळेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना नामदार करण्याचा शब्द दिला आहे. त्यासाठी आपल्याला आबांना आमदार म्हणून अगोदर निवडून आणावे लागेल. शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी गटातटाचे राजकारण टाळून एक दिलाने कामाला लागावे. पदाधिकाऱ्यांना मान दिला तरच पक्ष आणि नेत्याचा सन्मान वाढेल. पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटन मजबुत करावे नसता पदावर राहण्याचा अधिकार नाही. पक्षसंघटन मजबूत असेल तरच बदामराव पंडित हे विजय होती म्हणूनच आपण प्रत्येक सर्कलला जावुन शाखाप्रमुख व शिवसैनिकाची भेट घेणार आहोत. केवळ झकपक कपडे आणि डिजिटल वर दिसणारे पदाधिकारी शिवसेनेला नकोत, असे ठणकावून सांगत आनंदराव जाधव यांनी, येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे बदामराव पंडित हेच गेवराई तालुक्याचे युतीचे आमदार असतील असा ठाम विश्वास व्यक्त केला. तर महिला आघाडी जिल्हा संपर्कप्रमुख संपदाताई गडकरी यांनी बदामराव पंडित यांचा गोतावळा पाहिल्यानंतर लोकनेता कसा असतो हे लक्षात येते. कोणाविषयी मनामध्ये कपट आणि पाप नसलेले बदामराव पंडित हे देव माणूस आहेत असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाउपप्रमुख दिनकर शिंदे यांनी केले. यावेळी तालुकाप्रमुख कालिदास नवले, माजी सभापती पंढरीनाथ लगड यांनी तालुक्यातील शिवसेनेच्या कार्याचा लेखाजोखा मांडला.
बैठकीस उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब अंबुरे, माजी जि प सदस्य शामराव राठोड, महादेव औटी, उपजिल्हाप्रमुख शेख एजाज, उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे, शहरप्रमुख परमेश्वर बेदरे, महिला आघाडी तालुका संघटक उज्वलाताई भोपळे, लताताई कानगुडे, युवासेना ता अधिकारी साहिल देशमुख, आजमखान पठाण, सय्यद मुस्ताकिम, रवींद्र बोराडे, बाबुराव जाधव, जालिंदर कामटे, बदाम पौळ, गणेश लाड, सय्यद माजेद, महादेव बेदरे, मुक्ताराम आव्हाड, शेख नविद, सरपंच मुकुंद बाबर, युवराज जाधव, गिन्यांदेव तेलुरे, सुनील म्हेत्रे, आदींसह शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....