संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या उपस्थितीत आज गेवराईत शिवसैनिकांच्या बैठका


संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या उपस्थितीत
आज गेवराई व तलवाड्यात शिवसैनिकांच्या बैठका
=========================
टाकरवणला महिला मेळावा व शाखा शुभारंभ
====================
गेवराई ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्याचे नवनियुक्त संपर्कप्रमुख आनंदराव जाधव हे आज दि 25 फेब्रुवारी  रोजी गेवराई विधानसभा मतदार संघात येत असून त्यांच्यासह माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या उपस्थितीत गेवराई व तलवाडा येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठका तर टाकरवन येथे महिला शाखा स्थापना व मिळावा होणार आहे. या कार्यक्रमास शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख कालिदास नवले यांनी केले आहे.
          बीड जिल्ह्याचे नवनियुक्त शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव हे दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी उपस्थित शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत. दुपारी 12 वाजता तलवाडा आणि रेवती देवकी या दोन्ही जि प सर्कलमधील शिवसेना पदाधिकार्‍यांची तलवाडा फाटा येथील गोविंद जोशी यांच्या निवासस्थानी बैठक घेणार आहेत. तदनंतर सायंकाळी 6 वाजता टाकरवन येथे महिला मेळावा त्याचबरोबर शाखा  स्थापना आणि पदाधिकारयांची बैठक घेणार आहेत. त्यांच्यासमवेत माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सर्व बैठका व मेळाव्यास शिवसेनेच्या जि प सदस्य, पं स सदस्य, सरपंच व सदस्य, सोसायटीचे चेअरमन व सदस्य तसेच पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना गेवराई मतदारसंघ प्रमुख संतराम काळे, तालुकाप्रमुख कालिदास नवले, उपजिल्हाप्रमुख शेख एजाज, उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे, तालुकाप्रमुख दिनकर शिंदे, शहर प्रमुख परमेश्वर बेदरे, तालुका संघटक गणेश चव्हाण, युवासेना तालुकाप्रमुख साहिल देशमुख, किसानसेना तालुकाप्रमुख सतीश सपकाळ, महिला तालुका संघटक ऍड उज्वलाताई भोपळे आदींनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....