3 हजाराची लाच स्विकारताना गेवराई पं.स.मधील विस्ताराधिकारी पकडला
3 हजाराची लाच स्विकारताना गेवराई पं.स.मधील विस्तार अधिकारी येळंबकर लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला ------------------------------------- गेवराई ( दिनकर शिंदे ) शेतातील बांधबंदिस्तच्या कामावरील फाईलवर टिप्पणी टाकुन देण्यासाठी गेवराई येथील पंचायत समिती मधील विस्तार अधिकाऱ्यानी 4 हजाराची लाच मागितली होती. दरम्यान यामधील 3 हजाराची लाच स्विकारताना त्यास रंगेहाथ पकडले. हि कारवाई लाचलुचपत विभागाने येथील पंचायत समितीमध्ये बुधवारी 1 वाजण्याच्या सुमारास केली. या कारवाईमुळे पंचायत समितीमध्ये मोठी खळबळ उडाली होती. विनायक भास्करराव येळंबकर असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील एका तक्रारदाराने शेतातील बांधबंदिस्त कामावरील फाईलवर टिप्पणी टाकण्यासाठी येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विनायक येळंबकर हे 4 हजाराची लाच मागत असल्याची तक्रार करण्यात आली होती. यानंतर या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष पडत...