Posts

3 हजाराची लाच स्विकारताना गेवराई पं.स.मधील विस्ताराधिकारी पकडला

3 हजाराची लाच स्विकारताना गेवराई पं.स.मधील विस्तार अधिकारी येळंबकर लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला ------------------------------------- गेवराई ( दिनकर शिंदे  )   शेतातील बांधबंदिस्तच्या कामावरील फाईलवर टिप्पणी टाकुन देण्यासाठी गेवराई येथील पंचायत समिती मधील विस्तार अधिकाऱ्यानी 4 हजाराची लाच मागितली होती. दरम्यान यामधील 3 हजाराची लाच स्विकारताना त्यास रंगेहाथ पकडले. हि कारवाई लाचलुचपत विभागाने येथील पंचायत समितीमध्ये बुधवारी 1 वाजण्याच्या सुमारास केली. या कारवाईमुळे पंचायत समितीमध्ये मोठी खळबळ उडाली होती.  विनायक भास्करराव येळंबकर असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे.               लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील एका तक्रारदाराने शेतातील बांधबंदिस्त कामावरील फाईलवर टिप्पणी टाकण्यासाठी येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विनायक येळंबकर हे 4 हजाराची लाच मागत असल्याची तक्रार करण्यात आली होती. यानंतर या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष पडत...

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

Image
युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत तर संपर्कप्रमुख गेवराईत दाखल ================= भाजप पदाधिकारी शांत मात्र लक्ष्मणसेना संभ्रमात ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना आणि भाजप यांची युती जाहीर होताच, गेवराई विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या हालचाली वाढल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने बोलवलेल्या बैठकीसाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित हे मुंबईत तर दुसऱ्याच दिवशी जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव गेवराई तालुक्यात दाखल झाले आहेत. यामुळे शिवसैनिकात उत्साह पहायला मिळत आहे.             राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा शिवसेना व भाजपने निर्णय जाहीर केला आणि एकदाची युती जाहीर झाली.  राज्यात शिवसेना-भाजपच्या झालेल्या युतीमध्ये सत्तेत समान वाटा दोघांचाही असेल, असे भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आले. युती जाहीर...

बीड हा बाळासाहेब ठाकरे यांच्या सच्चा सैनिकांचा जिल्हा -- संपर्कप्रमुख आनंदराव जाधव

Image
जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी झंझावती दौरा करून बीड तालुक्याचा घेतला आढावा =================== ● कुंडलिक खांडे "दबंग" जिल्हाप्रमुख -- आनंद जाधव ---------------------------- चारा छावणीलाही भेट ; शेतकऱ्यांशी साधला संवाद ==================== बीड  ( प्रतिनिधी ) शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या असलेल्या बीड विधानसभा मतदारसंघात जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सर्कल निहाय शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन झंझावती दौरा केला जनावरांच्या चारा छावणीला भेट देऊन आनंद जाधव यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे.           लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात झालेल्या शिवसेना-भाजप युतीच्या घोषणे नंतर बीड जिल्ह्यात आलेल्या जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी गेवराई तालुक्यानंतर नंतर बीड विधानसभा मतदारसंघात झंजावती दौरा केला. बीड शहरातील  पदाधिकारी व शिवसैनिकांशी शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयात  चर्चा केल्यानंतर संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी मौजे घाटसाळवी येथे शिवसेनेच्या शाखेचा शुभारंभ ...

शिवसेना महिला आघाडीची शाखा स्थापन करून रणरागिणींनी रणशिंग फुंकले ..

Image
शिवसेना महिला आघाडीची शाखा स्थापन करून टाकरवणच्या रणरागिणींनी रणशिंग फुंकले ==================== आनंदराव जाधव व बदामराव पंडित यांची उपस्थिती ==================== गेवराई ( प्रतिनिधी )  सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जो धावून येईल आणि सुख, दुःख वाटून घेईल त्याच्याच पाठीशी मतदारसंघातील जनता उभा राहील, असा दृढ विश्वास व्यक्त करत शिवसेना महिला आघाडीची शाखा स्थापन करून टाकरवणच्या रणरागिणींनी जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या उपस्थितीत माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या विजयासाठी रणशिंग फुंकले आहे.           गेवराई विधानसभा मतदारसंघातील टाकरवण येथे  असंख्य महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शिवसेना महिला आघाडीच्या शाखेचा दि 25 फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव व माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सौ गिरीका भाभी पंडित, जि प सभापती युधाजित पंडित,  माजी सभापती पंढरीनाथ लगड,  युवानेते रोहित पंडित, भास्करराव कचरे, गेवराई तालु...

भारतिय जवानांनी हवाई हल्ला करत पाक अतिरेक्यांचा दहशतवादी तळ केला उद्‌ध्वस्त

Image
==================== दिल्ली ( प्रतिनिधी ) जम्‍मू- काश्मीरमधील पुलवामामध्ये भारतीय जवानांवर झालेल्‍या दहशतवादी भ्याड हल्‍ल्‍यामुळे 48  जवान शहीद झाले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या भारतीयांनी अतिरेक्यांवर मोठी कारवाई करण्याबाबत केंद्र सरकारवर मोठा दबाव आणला आहे. तसेच या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्‍तानमधील संबंध खूपच ताणले गेले आहेत. दोन्ही देशांच्या सीमेवरील हालचालींमध्येही वाढ झाल्‍याने युध्दसदृष्‍य परिस्‍थिती बनली आहे. सतत पाकिस्‍तानकडून शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन करण्यात येत आहे. भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे देशांमध्ये पाकिस्तान विरोधात संतप्त भावना व्यक्त होत आहेत. आता भारतानेही याचा बदला घ्यावा, यासाठी सरकारवर दररोज मोठ्या प्रमाणात दबाव वाढत असल्याने, अखेर भारतीय सैन्याने दि 26 फेब्रुवारी रोजी पहाटे मोठी कारवाई केली असून एलओसी ओलांडून हल्ला करत पाकच्या अतिरेक्यांचे दहशतवादी तळ उध्वस्त केले आहेत. याबाबत भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केल्याचा पाकच्या पत्रकाराचा व्हिडिओ पाकमधूनच सर्वत्र व्हायरल झाला आहे.        भारतीय हवाईदलाच्या विमा...

गेवराई व बीड मतदारसंघ शिवसेनेसाठी फिक्स ; बदामराव पंडित हेच होणार युतीचे आमदार -- संपर्कप्रमुख आनंदराव जाधव

Image
==================== गेवराई ( प्रतिनिधी ) शिवसेनेने लावून धरलेल्या मागण्या मान्य झाल्याने भाजपा सोबत सत्तेत समान वाटा राहील अशीच युती  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई आणि बीड हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेसाठी फिक्स असून इतर आणखी एक मतदारसंघही सोडून घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. गेवराईतून शिवसेनेचे बदामराव पंडित हेच युतीचे आमदार होतील असा ठाम विश्वास देऊन, बीड जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांनी घराघरात जाऊन पक्ष संघटन मजबूत करण्याच्या सूचना शिवसैनिकांना दिल्या आहेत.              येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना आणि भाजप यांची युती झाल्यानंतर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून नवनियुक्त शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव हे गेवराई विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी दि 25 फेब्रुवारी रोजी तालुक्यात आले आहेत. माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी झालेल्या शहरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते याप्रसंगी माजीमंत्री बदामराव पंडित, महिला जिल्...

संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या उपस्थितीत आज गेवराईत शिवसैनिकांच्या बैठका

Image
संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या उपस्थितीत आज गेवराई व तलवाड्यात शिवसैनिकांच्या बैठका ========================= टाकरवणला महिला मेळावा व शाखा शुभारंभ ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्याचे नवनियुक्त संपर्कप्रमुख आनंदराव जाधव हे आज दि 25 फेब्रुवारी  रोजी गेवराई विधानसभा मतदार संघात येत असून त्यांच्यासह माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या उपस्थितीत गेवराई व तलवाडा येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठका तर टाकरवन येथे महिला शाखा स्थापना व मिळावा होणार आहे. या कार्यक्रमास शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख कालिदास नवले यांनी केले आहे.           बीड जिल्ह्याचे नवनियुक्त शिवसेना संपर्कप्रमुख आनंदराव जाधव हे दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी उपस्थित शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत. दुपारी 12 वाजता तलवाडा आणि रेवती देवकी या दोन्ही जि प सर्कलमधील शिवसेना पदाधिकार्‍यांची तलवाडा फाटा येथील गोविंद जोशी यांच्या निवासस्थानी बैठक ...

11 महिन्यानंतरही पैशाऐवजी, तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हातावर दिल्या तुरी

Image
11 महिन्यानंतर केंद्रप्रमुख बागवान, सहकेंद्रप्रमुख शिंदे यांनी गेवराईतील तुर उत्पादक शेतकऱ्यांच्या हातावर ठेवल्या तूरी ==================== नाफेडला तूर घातलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात हाल ==================== गेवराई ( दिनकर शिंदे ) गेल्यावर्षी तुरीला शासनाने चांगला हमीभाव दिल्याने गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेडला फेब्रुवारी मार्च 2018 मध्ये तुर विक्री केली होती परंतु तब्बल 11 महिन्यानंतर या तुरीचे पैसे देण्याऐवजी केंद्रप्रमुख बागवान सह केंद्रप्रमुख रामेश्वर शिंदे आणि ऑपरेटर भामरे यांनी शेतकऱ्यांच्या हातावर अखेर तूरी ठेवल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांमधून या कर्मचाऱ्यांसह  प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.          याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दोन वर्षापूर्वी गेवराई तालुक्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने, गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन शेतकऱयांकडून घेण्यात आले. शेतकऱ्यांचे कष्ट आणि निसर्गाने दिलेल्या साथीमुळे तूर उत्पादनही चांगले झाले. त्यातच शासनाने तुरीच्या पिकाला 5500  रुपयाचा प्रति क्विंटल चांगला हमीभाव ...

गेवराईत 45 लाखांचा गुटखा पकडला ; ट्रक घेतली पोलिसांनी ताब्यात

Image
गेवराई ( दिनकर शिंदे  ) गेवराई -गढी दरम्यान पोलिसांच्या विशेष पथकाने एका ट्रकमध्ये 45 लाखांचा गुटखा पकडला आहे. हा ट्रक धाराशीवहून जालन्याकडे जात होता. वाटेत एका हॉटेलजवळ तो उभा असताना पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.  शुक्रवारी रात्री अडीच वाजता गेवराई गढी रोड वरील ट्रक क्रमांक एम.एच 18 एए 6845 हा गढी जवळील राजस्थानी हॉटेल समोर थाबंल्याची माहिती पोलीस अधिक्षक बीड यांच्या पथकाला मिळाली. त्या माहितीवरून लगेचच या पथकाने पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांच्या नेतृत्वाखाली गेवराईच्या दिशेने धाव घेतली आणि ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून एकनाथ दत्तु परदेशी (संजयनगर ता. श्रीरामपुर जि, नगर) आणि शेख जब्बार शेख (मुसा रा, लोहगाव पुणे) अशी त्यांची नावे आहेत.

25 फब्रुवारीला इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा राज्यव्यापी बंद

 गेवराई ( दिनकर शिंदे ) ------  इन्डिपेन्डट इंग्लिश स्कुल्स असोसिएशन ( IESA ) संघटना गेल्या सहा वर्षापासून इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे विविध प्रश्न सोडवून घेण्यासाठी काम करीत आहे. याच मगण्यांसाठी दि 25 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱयांनी दिली आहे.          इंग्रजी शाळांच्या समस्यांबद्दल अनेक वेळा शासन दरबारी वेगवेगळ्या माध्यमांतून निवेदने यापूर्वी देण्यात आली असतांना देखील, शासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही.  त्यामुळे  ईसा संघटना इंग्रजी शाळांचा राज्यव्यापी एक दिवशीय शाळाबंद आंदोलन करणार आहे. दि .२५ फेब्रुवारी वार सोमवार रोजी ईसा संघटनेच्या सभासद असलेल्या राज्यातील ५ हजार शाळा या आंदोलनात सहभागी होणार आहेत . राज्याप्रमाणे आपल्या बीड जिल्हयातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा या दिवशी बंद ठेवून आपला सहभाग नोंदविणार आहेत . जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईसा संघटनेच्या राज्यव्यापी शाळा बंदची आपण दखल घेऊन संघटनेच्या खालील मागण्या शासनदरबारी मांडून तात्काळ कार्यवाही होण...

रामपुरीच्या अमरसिंह मस्के यांची घोडी सर्वात खुबसूरत ; 21 हजाराचे प्रथम पारितोषिक

Image
रामपुरीच्या अमरसिंह मस्के यांची घोडी सर्वात खुबसूरत अश्वस्पर्धेत 21 हजाराचे प्रथम पारितोषिक पटकावले ==================== गेवराई ( दिनकर शिंदे )  शिवजयंती निमीत्त दि 19 रोजी तीर्थपुरी येथे अश्वस्पर्धा घेण्यात आल्या. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत गेवराई तालुक्यातील रामपूर येथील अमरसिंह अंकुशराव मस्के यांची घोडी सर्वात खूबसूरत ठरली असून या अश्वाने खूबसुरती मध्ये 21 हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.         शिवजयंतीनिमित्त तीर्थपुरी येते आयोजित  या अश्व स्पर्धेत आपल्या अश्वांसह अश्वधारकांनी मोठा सहभाग नोंदवला. आ. राजेश टोपे यांच्या हस्ते  शिवप्रतिमेचे पुजन करुन या स्पर्धाना सुरुवात झाली. यावेळी सागरचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, सरपंच शैलेंद्र पवार, संयोजक चंद्रकांत पवार व सुदाम मापारे तसेच मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या यातील खूबसूरती या गटातील प्रथम क्रमांकाचे 21 हजाराचे बक्षीस गेवराई तालुक्यातील रामपूरी येथील अमरसिंह अंकुशराव म्हस्के यांच्या अश्वाला देण्यात आले. दितीय बक्षीस 11 हजार रुपये गोविंद फनसे यां...

पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत जमियत उलेमा , मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध

Image
बीड दि.18 [ दिनकर शिंदे ]  ----- शहीद जवानांना आदरांजली अर्पण ============================= जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या  जवानांना जमियत उलेमा ए हिंद बीडच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. सोमवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून रॅली काढून पाकिस्तान मुर्दाबाद,  हिंदुस्थान जिंदाबाद , वीर जवान अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. या रॅलीमध्ये मुफ्ती,  मौलाना यांच्यासह राजकीय पदाधिकारी , कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड येथील जमियत उलेमा ए हिंद शाखेच्या वतीने सोमवारी मल्टीपर्पज  मैदान येथून  निषेध रॅली काढण्यात आली. पुलवामा येथील दहशतवादी  हल्ल्याचा  तीव्र शब्दात  निषेध नोंदवण्यात आला.  हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन  रस्त्यावर उतरलेल्या जमियत उलेमा हिंदच्या पदाधिकाऱ्यांसह मुस्लिम युवक आणि नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबाद , हिंदुस्तान जिंदाबाद , वीर जवान अमर रहे अशा घोषणा दिल्या. त्यानंतर उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन बाळगून भारतीय जवानांन...

महापुरुषांना जाती धर्माच्या बंधनात बांधु नका -- गणेश सावंत

Image
गेवराई [ दिनकर शिंदे ] ------- जातेगावात शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी =============================== तरुणांनी समाजहिताच्या कार्यात गटतट विसरुन एकञ यावे. राजकारणापेक्षा समाजकारणात तरुणांनी झोकुन देऊन कार्य करत राहील्यास, गावाच्या विकासाला चालना मिऴेल. शिवजयंती निमीत्त व्याख्यान व समाजहिताचे उपक्रम ठेवल्याने उद्याच्या पिढीला चांगले संस्कार लागतील असे प्रतिपादन शिवव्याख्याते गणेश सावंत यांनी जातेगाव येथे आयोजित शिवजयंती उत्सव प्रसंगी केले आहे.          गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमीत्त दि 18  रोजी नृत्य स्पर्धा तसेच, दि 19 रोजी शिवप्रतीमा पुजन व गावातुन बालशिवाजी महाराजांची घोड्यावर टाऴमृदंगाच्या व ढोलताशाच्या गजरात मिरवनुक काढण्यात आली.  दुपारी यमाई मंदीरात बालकिर्तनकार सोनाली सागडे हिचे शिवकिर्तन संपन्न झाले.  शिवजयंती अध्यक्ष गोपाल  चव्हाण, उपाध्यक्ष बाऴासाहेब चव्हाण, सचिव कालीदास काकडे,  रामेश्वर चव्हाण, भरत दादा चव्हाण, सुनिल मिसाऴ, करण यमगर, अण्णा चव्हाण, आशिष कुलकर्णी, यांनी डि जे व वर्गणी मु...

नरेंद्र मोदींचा काँग्रेसमुक्तचा तर आ लक्ष्मणराव पवारांचा पंडितमुक्तचा नारा फसला

Image
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसमुक्त भारतचा तर आ लक्ष्मणराव पवारांचा पंडितमुक्त गेवराईचा नारा फसला ==================== युती - आघाडी जाहीर झाल्यावर होणार "सावळा गोंधळ" ====================     ●[ राजकीय आखाडा / दिनकर शिंदे, गेवराई ]● ====================  भाजपानेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिलेला काँग्रेसमुक्त भारतचा नारा आणि गेवराईतील भाजप आमदार लक्ष्मणराव पवार यांनी पंडितमुक्त गेवराई चा दिलेला नारा हे दोन्हीही फोल ठरले आहेत. कारण या नाऱ्या नंतर पाच राज्यात भाजपची सत्ता जाऊन कॉंग्रेसने सत्ता स्थापन केली तर गेवराईत ग्रामपंचायतीसह, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये पंडितांची सत्ता आली त्यामुळे दोन्ही नारे फोल ठरल्याने देश आणि तालुकास्तरावरील राजकीय स्थिती यापुढे बदलताना दिसेल हे निश्चित.             देशात दोन खासदार असलेला भाजपा हा पक्ष 2014 च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक जागी खासदार विजय झालेला पक्ष ठरला. त्यानंतर मात्र नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारत...

"समय के साथ चलो"चा 57 वर्षाच्या रशीद भाईंकडून संदेश

Image
प्रदूषण मुक्तीसाठी गेवराईत इलेक्ट्रॉनिक रिक्षा सुरू करून "समय के साथ चलो"चा 57 वर्षाच्या रशीद भाईंकडून संदेश ====================                 दखल         ---------------------             दिनकर शिंदे ====================  कारखाने, विविध उद्योगधंदे, भरमसाठ रस्त्यावर वाहणारी वाहने यांच्या सुटणाऱ्या धुरामुळे  प्रचंड प्रमाणात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी, त्याचबरोबर पेट्रोल-डिझेलच्या अतिवापरामुळे वाढत असलेल्या दरावर आळा घालण्यासाठी आता इलेक्ट्रॉनिक ऑटो रिक्षा वापरावा आणि आर्थिक बचतही करावी, असा "समय के साथ चलो" चा संदेश गेवराईच्या शेख रशीद शेख उमर  या 57 वर्षाच्या रिक्षाचालकाने ऑटो रिक्षाधारक नवयुवकांना दिला आहे.            सध्या पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या टु व्हीलर, थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांची बेसुमार संख्या झाली असून, रहिवासी क्षेत्रातूनही यांची मोठ्या प्रमाणात धूर सोडत रहदारी सुरू झाली आहे. यामुळे हवेचे प्रदूषण होऊन स्वतःच्या व इतरां...

विमला विद्यालयात १०वी विद्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा कार्यक्रम संपन्न

गेवराई ( दिनकर शिंदे ) येथील विमला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इ.१० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा कार्यक्रम घेण्यात आला.      कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव अनुराग अट्टल तर प्रमुख पाहुणे म्हणून विमला विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका वंदना हिरे या होत्या. शाळेचे मुख्याध्यापक कैलास जोगदंड, वर्गशिक्षक कालीदास घोडके,   प्रा.सूरज कुलकर्णी हे व्यासपीठावर उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या सुरुवात विद्यार्थीनींच्या स्वागतगीताने  करण्यात आली. उपस्थितांचे व सर्व शिक्षकांचे गुलाबपुष्प देवुन स्वागत करण्यात आले. इ.१० वी च्या मुलांचे स्वागत इ.९ वी च्या मुलांनी केले. या प्रसंगी  मान्यवरांनी मूलांना परिक्षेसाठी शूभेच्छा देत, भावी जीवनासाठी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी  विद्यार्थ्यानी आपली मनोगते व्यक्त करत, शाळा व शिक्षकांविषयी ऋण व्यक्त केले.  कार्यक्रमाचे प्रास्तविक सूधाकर ससाणे,  सुत्रसंचलन याज्ञिकी कुलकर्णी व आरती परळकर तर आभार कांचन नाईकवाडे हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  नरेंद्र कुलकर्णी, नितिन कुलथे, संजय खे...

संतोष भाले यांना म फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Image
 गेवराई दि १८ ( दिनकर शिंदे ) तालुक्यातील राजपिंपरी येथील जि प प्राथमिक शाळेतील शिक्षक  संतोष सिताराम भाले यांना यंदाचा इब्टा संघटनेचा महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे .       इंडियन बहुजन टीचर असो. ( इब्टा ) या शिक्षक संघटनेच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केल्या बद्दल भाले संतोष यांना म फुले आदर्श शिक्षक पुरस्कार शनिवार दि २३ फेब्रु २०१९ रोजी दु २ वा आ जयदत्त क्षीरसागर यांचा हस्ते व माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड येथील सामाजिक न्याय भवन येथे दिला जाणार आहे. गेली २५ वर्षे भाले यांनी रुई रांजणी, भाटआंतरवाली, राजपिंप्री येथे शिक्षक म्हणून सेवा करीत अनेक उपक्रम राबविले आहेत. समाज सहभागातून निधी उपलब्ध करून शाळा डिजिटल करणे, ऊसतोड शिबिर सुरु न करता 65 विद्यार्थी पालकांसोबत जाण्यापासून रोखले, शाळा सिध्दी मध्ये A ग्रेड मध्ये शाळा आणण्यासाठी प्रयत्न, स्वतःच्या मुलीचा वाढदिवस घरी न करता, तो साजरा करताना शाळेतील सर्व 250 विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले, शाळेतील विद्यार्थ्य...

चांगले कार्य केल्याशिवाय , चांगला माणूस ही पदवी मिळत नाही -- संतोष गर्जे

Image
गेवराई [ दिनकर शिंदे ] ------- श्री संत भगवानबाबा विद्यालयात दहावीतील विद्यार्थ्यांना निरोप ------------------------ आयुष्यात शिक्षण घेऊन अनेक पदवी मिळवता येतील परंतु चांगला माणूस म्हणून पदवी मिळवायची असेल तर त्यासाठी निश्चितपणे चांगले कार्य करावे लागते. कमी गुण मिळाले म्हणून खचून न जाता आयुष्याच्या परीक्षेत गुणात्मक जीवन जगू या उद्देशाने काम करा, असा मौलिक सल्ला सहारा अनाथालयचे संचालक संतोष गर्जे यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव या शाळेत दि.१८ रोजी दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला, त्याप्रसंगी गर्जे बोलत होते.       या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पूजन करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहारा अनाथालय गेवराईचे संस्थापक अध्यक्ष संतोष गर्जे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच तात्याराम सुळ, माजी सरपंच जनार्दन चितळकर, सखाराम मुगुटराव, मधुकर मुगुटराव, जि.प.के प्रा. शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक बापुराव घु...

शिवभक्तांनो घरावर भगवा झेंडा लावून प्रत्येकात शिवविचार रुजवा -- बदामराव पंडित

Image
==================== शिवजयंती निमित्त बंगल्यावर फडकवला भगवा झेंडा ==================== गेवराई ( प्रतिनिधी ) स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. सरदारांना शेतकऱ्यांच्या गवताच्या पात्याला धक्का न लागू देण्याचे आदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपल्या घरावर भगवे ध्वज उभारून साजरी करा आणि प्रत्येकाच्या मनात शिवविचार रुजवा असे आवाहन माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी शिवभक्तांना केले आहे.               छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवजयंती पूर्वदिनी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी आपल्या बंगल्यावर भगवा ध्वज उभारून शिव प्रतिमेस अभिवादन केले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अमोल करंडे, जेष्टनेते गहिनीनाथ ढाकणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे, उपजिल्हाप्रमुख शेख एजाज, तालुका उपप्रमुख दिनकर शिंदे, शाहिन पठाण, सुलेमान पठाण, आबा उबाळे, सरपंच सुरेश नागरे, जालिंदर कामटे, सुनील म्हेत्रे, शेख सादेक, राऊत, नावडे, पापा चव्हाण, गंगाधर गोरडे आदी...

शिवसेना किसान आणि जवानांच्या पाठीशी -- बदामराव पंडित

Image
शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अर्धमसल्याच्या असंख्य पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश ==================== शिवसेना किसान आणि जवानांच्या पाठीशी -- बदामराव पंडित ================= गेवराई ( प्रतिनिधी ) जम्मू कश्मीर मधील पुलवामा येथे पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अर्धमसला येथील असंख्य युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित यांनी जवान आणि किसान यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभा असल्याचे प्रतिपादन केले आहे.                 गढी जिल्हा परिषद सर्कल मधील अर्धमसला येथील सरपंच राधाबाई विठ्ठल भालशंकर, ऍड सिंधुताई संजयकुमार चौधरी, विक्रम राऊत, अंगद राऊत, उद्धव पोवळे, अशोक धापसे, उद्धव धापसे, संदीप माटे, अभिमन्यू काळे, राम कादे, प्रल्हाद राऊत, अशोक राऊत, गोरख काळे, अनिल काळे, रमेश उघडे, अंगद मैंद, एकनाथ धापसे, रावसाहेब धापसे, राजाभाऊ पिंपळे, किरण काळे, आश्रुबा भालशंकर आदींसह असंख्य भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत...