288 मतदारसंघाच्या आढाव्यासाठी पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार महाराष्ट्रातील 288 मतदारसंघाचा आढावा ; मुंबईत बोलावली तातडीची बैठक मुंबई ( प्रतिनिधी )– विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. अशातच आता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील 288 विधानसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख आणि उपसंपर्कप्रमुख यांची तातडीने बैठक बोलावली आहे. उद्या शिवसेना भवन येथे दुपारी 12 वाजता ही बैठक सुरु होणार आहे. या बैठकीत विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान शिवसेना पक्षाचा 53 वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात काल साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या वाटाघाटीबद्दल भाष्य केलं. ‘आमचं सगळं ठरलंय. योग्य वेळी जाहीर करू. आता सगळं समसमान पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांकडे पाहून उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच आता यापुढे एका युतीची पुढची गोष्ट असेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.य होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सर्वात मोठा खुलासा केला. आम...