निरोगी शरीरासाठी सूर्यनमस्कार हाच पर्याय_ -------प्रा.राजेंद्र बरकसे
गेवराई - ( प्रतिनिधी ) - धकाधकीच्या जीवनात प्रचंड कामांमुळे व्यक्ती आणि अभ्यासाचा दबाव व मोबाईलवरील खेळामुळे मुले,मुली तणावात आहेत.त्यामुळे शरीरावर त्याचा वाईट परिणाम होत आहे.निरोगी राहण्यासाठी आज आजपासून प्रत्येकाने दररोज किमान पन्नास सूर्यनमस्कार घालावेत,असे आवाहन पतंजली योग समीतीचे प्रमुख प्रा.राजेंद्र बरकसे,योग शिक्षक प्रशांत कुलकर्णी यांनी केले.
शहरात जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त पतंजली योग समितीतर्फे शारदा विद्यामंदीरच्या मैदानावर जागतिक सूर्यनमस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र जगदाळे यांच्यासह शिक्षकवृंद आवर्जून उपस्थित होते.
Comments
Post a Comment