कारभाराला कंटाळून गढीच्या ग्रामपंचायतला संतप्त ग्रामंपचायत सदस्यानीच ठोकले कुलूप


 =================
गेवराई ( प्रतिनिधी ) गढी येथे गेल्या ४ वर्षापासून १४ व्या वित्त  आयोगाचे ४० लाख रूपये पडून आहेत. त्याचा एकही रूपये सरपंच व ग्रामसेवक यानी जानून बुजून खर्च केला नाही. तसेच वैक्तीक घरकुलसाठी नागरीकाना पैशाची मागनी करण्यात येत असल्याचा आरोप करून संतप्त विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीलाच कुलूप ठोकले.
             ग्रामपंचायत सदस्याला विचारात न घेता तसेच सामान्य ग्रामस्थांच्या सूचना लक्षात न घेता  सरपंच व ग्रामसेवक परस्पर ठराव घेतात. तसेच वैक्तीक विहीरीसाठी सुधा परस्पर नावे लावतात. यामुळे सर्वसामान्य लोकाना त्रास होत आहे.  ग्रामंपचायत कार्यालयात केवळ प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण करण्यासाठीच  उघडले जाते. त्या नतंर थेट दुसऱ्या झेडांवदंनलाच उघडले जाते. तोपर्यत तिथे कुणीही फिरकत नाही . लोकाना शुल्लक कामासाठीही १० ठिकाणी विचारपुस करावी लागते. कारण ग्रामंपचायत बंद असते. गावात या ४ वर्षात कसलेही काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे गावातील समस्या मोठया प्रमाणात वाढलेल्या आहेत. ग्रामस्थाचे कोणतेही कामे होत नाहीत. विशेष म्हणजे कोणतीही मासिक सभा अद्याप प्रत्यक्ष झालेली नाही. ग्रामसभा नाही आणी सदस्याला कुठली माहितीही ग्रामपंचायतच्या मार्फत मिळत नाही. वारंवार ग्रामसेवक व पचांयत समितीला सांगून पत्र व्यवहार करूनही काही फरक पडत नसल्यामुळे दि 14 फेब्रुवारी रोजी गावचे ग्रामंपचायत सदस्य रजितंराव नाकाडे ( सौ पार्वती यांचे पती ), ग्रा पं सदस्य गायकवाड अंकुशराव दामोदर,  ग्रां पं सदस्य नाकाडे दिलीपराव पांडुरगं,  ग्रां पं सदस्य मुढे रामदास बाबासाहेब,  ग्रां प सदस्य घोगंडे विष्णुपंत या संतप्त झालेल्या सदस्यांनी  ग्रांमपंचायतला कुलूप ठोकले आहे. यावेळी गावातील नागरीक  मोठया संख्येने उपस्थित होते.  ग्रामसेवकाने गावात येऊन सर्व सदस्याना विश्वासात घेऊन कामाची व रकमेची माहिती दिल्या शिवाय कुलूप उघडणार नाही अशी भुमीका सदस्यानी घेतली आहे .

Comments

Popular posts from this blog

शिवसेनेच्या बदामराव पंडित यांचा पुन्हा एकदा भाजप आ लक्ष्मण पवारांना धक्का

पार्श्वभूमीचे संपादक गंमतभाऊ भंडारी याना नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे