शिक्षक समितीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी लहू पवार तर प्रसिद्धी प्रमुखपदी योगेश सोळसे यांची निवड
===================
गेवराई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा बीड जिल्हा कार्यकारणीची बैठक माननीय राजेंद्र खेडकर राज्य संपर्कप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक भवन बीड येथे दि.10/02/2019 रोजी संपन्न झाली.
या बैठकीत प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या, समितीचा प्रचार-प्रसार करणे इत्यादी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करून दुसऱ्या सत्रात विषयक नियामक सभा संपन्न झाली. यामध्ये बीड जिल्हा कार्यकारिणीची मुदत न संपल्यामुळे एका वर्षासाठी कार्यकारणी सर्वसंमतीने निवडण्यात आली.
बीड जिल्हा नूतन कार्यकारणीत कार्याध्यक्ष म्हणून लहू पवार गेवराई तर प्रसिद्धीप्रमुख पदी योगेश सोळसे गेवराई यांची निवड करण्यात आली. या बैठकीस अशोक बांगर,दिलीप खाडे,अशोक धोंडे,अरुण घुले, सुंदर डोंगरे,दीपक पुरी,विशाल कुलकर्णी,बाबुराव नागरगोजे,प्रेम सिडाम,रंगनाथ शिंदे,कैलास शेकडे,विनोद राख,गणेश मिसाळ, उद्धव परदेशी,रमेश मोराळे,मधुकर वाघमारे,केशव भारती,केशव बादाडे,महादेव ढाकणे,रत्नाकर फड,प्रताप कांदे,एम.एम.मुंडे,महादेव शिंदे, भगवान सोनार,सुनिल डोईफोडे,बचाटे बालासाहेब,वारे डी.एल,वनवे शहादेव, पवार एस.के, जाधव के.बी. वरील पदाधिकार्यांच्या निवडी नंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या गेवराई तालुक्यात नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून लहू पवार यांच्या कार्याची दखल घेऊन राज्याच्या नेतृत्वाने लहू पवार यांची जिल्हा कार्याध्यक्ष शिक्षक समिती बीड या पदावर तर योगेश सोळशे यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड केली या निवडीबाबत गेवराई तालुक्यातील सर्व शिक्षक मित्रांनी लहू पवार यांचे कौतुक केले यांच्या निवडीबद्दल आभार व्यक्त केले


Comments
Post a Comment