चलो वॉर्ड, चलो पंचायत अभियानच्या माध्यमातून युवक काँग्रेसचा परिवर्तनाचा निर्धार
बीडचे १४५ समन्वयक सक्रीय -- ऍड.श्रीनिवास बेदरे
===============
गेवराई ( प्रतिनिधी ) केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा थेट जनतेच्याच दरबारात पंचनामा करण्यासाठी आणि भविष्यात कॉग्रेस सत्तेवर आल्यानंतर युवक, शेतकरी आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणती धोरणे राबविणार आहे, याची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेस तर्फे राज्यभर 'चलो वार्ड, चलो पंचायतअभियान' राबविले जात असल्याची माहिती बीड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अँड श्रीनिवास बेदरे यांनी दिली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात बेदरे यांनी म्हटले आहे की, चलो वार्ड, पंचायत अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या निमित्याने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, सामान्य जनत्यासाठी काँग्रेस पक्षाचे धोरण नेमके काय असणार या बद्दल,"चलो पंचायत, चलो वॉर्ड अभियान हे गाव आणि शहरांना थेट काँग्रेस पक्षासोबत जोडणारा उपक्रम राबवत आहे. त्या सोबतच महाराष्ट्राच्या मनात भाजप बद्दलचा जो रोष आहे, मनात जे दुःख आहे , ते समजून घेण्यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जनसंपर्क करत आहेत. बीड जिल्ह्यात ६ विधान सभा मतदार संघात हा कार्यक्रम सुरु झाला आहे. आजवर बीड जिल्ह्यात ७००० लोकांपर्यंत युवक काँग्रेस थेट पोहोचली असल्याचे पत्रकात म्हटले आहे. तसेच या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी १४५ सक्रिय युवक काँग्रेस समन्वयक कार्यरत असल्याचे सांगून, बीड, गेवराई , परळी, केज, माजलगाव, शिरूर, आष्टी, वडवणी, अंबाजोगाई , या परिसरातील दुर्गम भागातही हे अभियान अत्यंत उत्साहाने राबविले जात आहे, या अभियानाला मिळणारा प्रतिसाद जनतेच्या मनातील भाजप विरोधाच्या संतापाचे प्रतीक आहे,असे आम्ही समजतो. अभियानाच्या माध्यमातून युवक काँग्रेस ५ कलमी कार्यक्रम राबवित आहे , यात युवकांसोबत संवाद साधून मोदी आणि फडणवीस सरकारकडून झालेली फसवणूक ,फसलेले आर्थिक धोरण आणि २ कोटी रोजगाराचे खोटे आश्वासन या बाबी युवकांच्या निदर्शनास आणून दिले जात असल्याचे श्रीनिवास बेदरे यांनी म्हटले आहे.

Good work sir keep it up..... only congress
ReplyDeleteGood work sir keep it up..... only congress
ReplyDelete