पगारे यांच्या अकाली निधनाने.. मन सुन्न झाले.. ● दिनकर शिंदे /गेवराई ●


गेल्या 20 वर्षापासून खांद्याला खांदा लावून दैनिक पार्श्वभूमी मध्ये पत्रकार म्हणून मी ज्यांच्या सोबत काम केले, असा माझा मित्र बबन पगारे आज त्यांना नियतीने आपल्या कवेत घेतले... संपादक मा गंमत भाऊ भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली बबन पगारे आणि मी गेल्या 20 वर्षापासून पार्श्वभूमीच्या माध्यमातून पत्रकारिता करत होतो....  दैनिक पार्श्वभूमीच्या वर्धापन दिनाला आयोजित केलेल्या प्रत्येक बैठकांमध्ये आम्ही एकमेकांची गळाभेट घ्यायचो.. आपल्या पार्श्वभूमीची अधिक प्रगती कशी होईल ? अंक कसा वाढेल ? इतरांपेक्षा आपला अंक कसा चांगला दिसेल ? वाचक कसे वाढतील ? याविषयी आमची नेहमीच थेट वैचारिक चर्चा व्हायची... राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर मजबूत पकड असलेल्या बबन पगारे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण, रोखठोक लिखाणाने स्वतःची एक वेगळी छाप निर्माण केली होती. बबन पगारे यांच्या रूपाने, अतिशय मोकळ्या मनाचा मित्र आम्हाला मिळाला होता... सतत हसत बोलणारा बबन पगारे एखादी गोष्ट खटकल्या नंतर आणि सत्य बाजू असल्याने बोलताना मात्र आक्रमक होताना आम्ही कित्येक वेळा पाहिला.. दिनांक 11 फेब्रुवारी रोजी दैनिक पार्श्वभूमी कार्यालयातून सकाळी, वसुली अधिकारी माडेकर यांचा फोन आला आणि त्यांनी बबन पगारे काळाच्या पडद्याआड गेल्याची दुःखद बातमी कळवली...  माझे तर अवसानच गळाले... मन सुन्न झाले...  एवढा हरहुन्नरी, सतत हसतमुख असणारा बबन पगारे कुठल्या तनावात असेल ? त्यांच्यावर कोणता दबाव असेल ? माहित नाही...  परंतु हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तो आम्हाला सोडून जाईल.. असे कधीच वाटले नाही. बबन... असा अर्ध्यावर आम्हाला का सोडून गेलास.... ? तुझी खूप आठवण येते रे मित्रा .... तुझी सतत उणीव जाणवत राहील...
मनःपूर्वक श्रद्धांजली... 
●दिनकर शिंदे / गेवराई ●

Comments

Popular posts from this blog

शिवसेनेच्या बदामराव पंडित यांचा पुन्हा एकदा भाजप आ लक्ष्मण पवारांना धक्का

पार्श्वभूमीचे संपादक गंमतभाऊ भंडारी याना नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे