आउट डेट व्हायचे नसेल तर नेहमी अपडेट राहा -- डॉ तानाजी जाधव

बीड ( दिनकर शिंदे ) -------  आउट डेट व्हायचे नसेल तर नेहमी अपडेट राहा -- डॉ तानाजी जाधव
====================
माजलगावात गणित शिक्षकांची उद्बोधन कार्यशाळा संपन्न
==========================
 प्रत्येक शिक्षकाने आपण शिक्षक असल्याची जाणीव कायम मनामध्ये ठेवावी त्याचबरोबर आपल्या सहकाऱ्यांच्या प्रती सतत आदर ठेवावा, म्हणजे आपल्यालाही सन्मान मिळेल. यापुढच्या काळात आउट डेट व्हायचे नसेल आणि टिकून राहायचे असेल तर नेहमी अपडेट राहा असा मौल्यवान सल्ला अंबाजोगाई प्रशिक्षण संस्थेचे डॉ तानाजी जाधव यांनी मुख्याध्यापक व गणित शिक्षकांच्या उद्बोधन कार्यशाळेत दिला आहे.
          विद्या प्राधिकरण पुणे अंतर्गत माजलगाव येथे सुरू असलेल्या गणित उद्बोधन कार्यशाळेत गेवराई व माजलगाव तालुक्यातील मुख्याध्यापक व गणित विषय शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सुरू असलेल्या कार्यशाळेत मुख्याध्यापक व गणित विषय शिक्षकांचे चार सत्रांमध्ये उद्बोधन करण्यात आले. गणित विषयाचा समवाय या विषयावर डॉ तानाजी जाधव, अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ? यावर अंगद राख,  असर अहवाल एलबीएल व एपीएल कार्यक्रम याबाबत उद्धव काकडे यांनी तर मूल्यमापन या विषयावर विजय दीक्षित यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. दिवसभर चाललेल्या या उद्बोधन कार्यशाळेत बोलताना डॉ तानाजी जाधव म्हणाले की, प्रत्येकाने अगोदर स्वतःवर प्रेम करावे. कारण जो स्वतःवर प्रेम करतो तोच जगावर प्रेम करू शकतो स्वतःची ओळख कधी विसरू नका. स्व चे अस्तित्व टिकवतो तोच सामान्य लोकांमध्ये टिकून राहतो. शाळेत काम करत असताना प्रत्येक शिक्षकाने व मुख्याध्यापकाने आपल्या सहकाऱ्यांविषयी आदर बाळगावा म्हणजे आपल्याला सन्मान मिळेल असे सांगून शिक्षकांनी आता पुस्तक घेऊन शिकवायचे दिवस संपले आहेत, कारण इंटरनेटमुळे प्रत्येकाला हवे ते शिक्षण घरबसल्या घेता येते, असे सांगून डॉक्टर तानाजी जाधव म्हणाले की, पाणी पिकाला द्यावे लागते शेतीला नाही, तसेच शिक्षण वर्गाला नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याला द्यावे लागते. गणित विषय हा खरोखरच सोपा आहे. तो सहज समजेल अशा सोप्या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून शिकवला गेला पाहिजे. नसता विद्यार्थ्यांना विनाकारण गणित अवघड वाटून त्याविषयी भीती निर्माण होते. हे टाळण्यासाठी गणित शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येकाने आउट डेट व्हायचे नसेल तर नेहमी अपडेट राहावे असा सल्लाही डॉ जाधव यांनी यावेळी दिला. उद्धव काकडे, अंगद राख व विजय दीक्षित याही तज्ञ मार्गदर्शकांनी अत्यंत सकारात्मक आणि अभ्यासपूर्ण उद्बोधन केल्याने उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षकांचा उत्साह वाढला आहे. गेवराई तालुका गणित अद्यापक मंडळाचे अध्यक्ष दिनकर शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यशाळेचे नियोजन मोती सर यांनी केली होते.

Comments

Popular posts from this blog

शिवसेनेच्या बदामराव पंडित यांचा पुन्हा एकदा भाजप आ लक्ष्मण पवारांना धक्का

पार्श्वभूमीचे संपादक गंमतभाऊ भंडारी याना नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे