गेवराई तालुक्यातील एक लाख जनावरांसाठी 22 छावण्यांचे प्रस्ताव दाखल --- गेवराई ( दिनकर शिंदे )
; मात्र 5 छावण्यांचेच प्रस्ताव पात्र
February 13, 2019
*गेवराई ( दिनकर शिंदे )*
--------- गेवराई तालुक्यात गंभीर दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली असून जनावरांच्या चारा , पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडून जनावरांसाठी छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रस्तावही मागविण्यात आले आहेत. तालुक्यातील जवळपास एक लाख जनावरांसाठी तहसील कार्यालयात 22 प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत मात्र यातील केवळ पाच प्रस्ताव पात्र ठरत असून सतरा प्रस्ताव मात्र तहसील कार्यालयात तसेच पडून राहण्याची शक्यता आहे.
सलग गेल्या चार ते पाच वर्षांपासून गेवराई तालुक्यात अत्यल्प पाऊस होत आहे. यावर्षी तर पावसाळा कधी सुरू झाला ? आणि कधी संपला ? हे कोणाच्या लक्षातही आले नाही. यावर्षी हजारो एकर शेतीमध्ये साधी पेरणीही झाली नाही तर ज्या शेतांमध्ये पेरणी झाली त्या पिकाला काही फळ आले नाही. काही अंशी पडलेल्या पावसामुळे थोडेफार ज्वारी, मूग, तूर घरी खाण्यापूरते झाले. परंतु आज जनावरांना चारा पाणी पिण्यास पाणी मात्र कोठेही उपलब्ध नाही ग्रामीण भागातील माणसांना पिण्याची पाण्याची व्यवस्था टॅंकरच्या माध्यमातून होताना दिसते परंतु जनावरांचं काय त्यांना जगवायचे कसे असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा राहिला आहे अशा स्थितीत शासनाने पशुधन जगविण्यासाठी छावण्या सुरू कराव्यात अशी काही शेतकऱ्यांची मागणी आहे तर दुसरीकडे छावणी ऐवजी दावणीला चारा पाणी द्यावे अशीही मागणी शेतकऱ्यातुन पुढे येत आहे.
या पार्श्वभूमीवर तालुक्यात छावण्या सुरू करण्यासाठी 22 प्रस्ताव शासनाकडे दाखल झाले आहेत. मात्र शासन निर्णयानुसार मंडळ स्तरावरील छावण्या प्रस्तावित कराव्यात या अध्यादेशानुसार तालुक्यातील ९ मंडळांपैकी केवळ ५ प्रस्ताव पात्र झाले आहेत . यामुळे सध्यातरी या ५ छावणीचे प्रस्ताव मंजुरीस पात्र असून हे प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. उर्वरित १७ प्रस्ताव तहसील कार्यालयात अद्यापही पडून आहेत. गेवराई तालुक्यात ७२ हजार ९८८ मोठी जनावरे तर छोटी जनावरे २५ हजार ५२७ असे एकूण जनावरे ९८ हजार ५१५ ऐवढी जनावरांची संख्या आहे. यापैकी हजारो जनावरे शेतकऱ्यांनी शेतात उगवलेल्या पिकावर आणि गवतावर जगवली. अनेकांनी तर चारा, कडबा, ऊस विकत घेऊन जनावरांना टाकला परंतु आता मागील काही दिवसापासून विकतचा चारा मिळणे देखील अवघड झाले आहे. पोटचं लेकरू आणि गोठ्यातील जनावर यात कधी फरक न करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे जनावरे जागवावी कशी या चिंतेने ग्रासले आहे. अनेक शेतकऱ्यांनी पाणी उपलब्ध असलेल्या पाहुण्यांच्या गावांना आपली जनावरे पाठवली. परंतु तिथेही त्यांची सोय लागत नसल्याने आपले पशुधन बाजारात विकायला काढले आहे. अशा गंभीर परिस्थितीत शेतकरी व जनावरांना दिलासा देण्यासाठी शासनाने उशिरा का होईना, चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
● याबाबत तहसीलदार अभय जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, छावण्या सुरू करण्यासाठी तालुकास्तरावर प्रस्ताव मागविण्यात आले असून, आतापर्यंत तालुक्यातून केवळ २२ प्रस्ताव प्राप्त झाले. यापैकी ५ प्रस्ताव मंजुरीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. मंडळ स्तरावर छावण्या प्रस्तावित करण्यात याव्यात या शासन निर्णयानुसार तालुक्यातील गेवराईसह सिरसदेवी , मादळमोही , जातेगाव व धोंडराई या पाच मंडळांतील प्रस्ताव प्राप्त आहेत . हे पाच प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. मंजुरी येताच छावण्या सुरू करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Post a Comment